Job Alert: पुणे : नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रकियेंतर्गत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.

महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत ‘ऍग्रो-मेट ऑब्झर्व्हर’ पदासाठी एक रिक्त जागा भरली जाणार आहे. या भरती प्रक्रियेत अर्ज करण्याची 30 नोव्हेंबर 2023 ही शेवटची तारीख असणार आहे.

पदाचे नाव : ऍग्रो-मेट ऑब्झर्व्हर
पदसंख्या : 01 जागा
नोकरीचे ठिकाण : कोल्हापूर
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
निवड प्रक्रिया : उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – सहयोगी संशोधन संचालक, विभागीय कृषी संशोधन केंद्र, शेंडा पार्क, कोल्हापूर- 416 012
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 नोव्हेंबर 2023
– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट https://mpkv.ac.in/ वरून माहिती घेता येणार आहे.







