पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आजपासून पुण्यात विमानतळावर थर्मल स्क्रिनिंग सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी दिली आहे.
सध्या चीनमध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पुणे एअरपोर्टवर एक पथक तयार असेल जिथे आयसोलेशनची गरज पडली तर ती देण्यात येणार आहे.
रवींद्र बिनवडे पुढे म्हणाले की, जगभरात पुन्हा एकदा करोनाने डोके वर काढले आहे. चीनमध्ये तर करोनाने कहर केला असून तेथे करोनाच्या पहिल्या लाटेसारखी स्थिती पाहायला मिळत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सगळ्या देशाची चिंता वाढली आहे.
भारतातली मागच्या वेळेसची करोनाची स्थिती पाहता यावेळी विशेष काळजी घेतली जात आहे. याबाबतील पुन्हा खबरदारी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून आजपासून बाहेरून येणाऱ्या प्रवाशांसाठी पुणे विमानतळावर थर्मल स्क्रीनिंग सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी दिली.
दरम्यान चीन मध्ये करोनाचा वाढता प्रदुभाव लक्षात घेता महापालिकेच्या माध्यमातून विविध उपाययोजना सुरू करण्यात आली असल्याचे यावेळी बिनवडे यांनी सांगितले.
जुने आर टी पी सी आर केंद्र पुन्हा कार्यान्वित करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. घरोघरी सर्वेक्षण करून आयएलआय व सारी रुंग शोधून त्यांची RTPCR चाचणी करण्याबाबत सूचना देण्यात आल्या. प्रत्येक पॉझिटिव्ह RTPCR च्या रुग्नाचे NIV ला जीनोम सिक्केवेन्सिंग करणे करीता पाठविनेच्या सूचना देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.