लठ्ठपणाची समस्या ही आज मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. त्यामुळे त्यावर जीम सारख्या उपाययोजना केल्या जातात. मात्र, तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर काही बाबींकडे लक्ष द्या. खाण्यामध्ये काही पदार्थ टाळल्यानेही लठ्ठपणाच्या समस्यावर मात करता येते. ते पदार्थ कोणते हे जाणून घेऊ.
हे पदार्थ खाणे टाळा:
1. साखरयुक्त पेये: कोल्ड ड्रिंक्स, पॅक केलेले फळांचे रस, एनर्जी ड्रिंक्स
2. जास्त तेलकट, तळलेले पदार्थ: जसे की, समोसे, भजी, पकोडे, फ्रेंच फ्राइज
3. जास्त प्रक्रिया केलेले अन्न: बर्गर, पिझ्झा, नूडल्स, चिप्स, पॅकबंद स्नॅक्स
4. मैदा व पांढऱ्या पिठाचे पदार्थ: पाव, पिझ्झा बेस, कुकीज, केक
5. मिठाई व बेकरी प्रॉडक्ट्स: डोनट्स, केक, पेस्ट्री, लाडू, बर्फी
6. अल्कोहोल: बिअर, वाईन, हार्ड ड्रिंक्स पिणे टाळा यातही खूप कॅलरी असते.
जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल, तर आवश्यकतेपेक्षा जास्त प्रमाणात तूप, बटर, चीज या पदार्थांचे सेवन मर्यादित करावे. तसेच संतुलित आहार घेणे महत्त्वाचे आहे.
(टीप: सदर माहिती वाचकांसाठी पुरवण्यात येत आहे, पुणे प्राईम न्यूज यातुन कोणताही दावा करत नाही.)