पुणे : दिवसभराच्या कामकाजावेळी अनेक जण, दहा मिनिटांच्या ब्रेकमध्ये चहा, कॉफी अशी पेयांचं सेवन करतात. आज आपण अशाच एका पेयाविषयी जाणून घणार आहोत. आज आपण अशाच एका ‘आईस टी’ विषयी जाणून घणार आहोत. ‘आईस टी’ फक्त शरीराला थंडावा देत नाही तर ती प्यायल्याने आपल्या आरोग्यासबरेच फायदे देते. सामान्यपणे आईस टी ब्लॅक किंवा ग्रीन टी पासून तयार केली जाते. आईस टीची चव वाढवण्यासाठी त्यात लिंबू, चेरी, मध टाकू शकता. आईस टीमध्ये पोटॅशिअम, फायबर, मॅग्नेशिअम, फ्लेव्होनॉइड यांसारखे अँटिऑक्सिडंट्स पोषक तत्त्व असतात.
‘आईस टी’ मध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि पोषक घटक असतात जे आपली रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात, त्यामुळे शरीराचे संसर्गापासून संरक्षण होते. ‘आईस टी’ च्या सेवनाने हृदयाचे आरोग्य उत्तम राहते. आईस टीमध्ये असलेलं फ्लेव्होनॉइड रक्तवाहिन्यातील सूज कमी करते, त्यामुळे हृदयासंबंधी होणाऱ्या आजारांपासून आपले संरक्षण होते.
त्वचेचा पोत सुधारतो. हाडे मजबूत राहतात. तसेच रक्तदाब कमी करण्यास मदत होते. ‘आईस टी’ प्यायल्याने दातांमधील पोकळीच्या समस्येपासून आराम मिळतो. ‘आईस टी’ च्या सेवनाने आपल्याला ताजेतवाने वाटते. साखरेचे योग्य प्रमाण आणि मर्यादित ‘आईस टी’ चे सेवन आरोग्यास उत्तम ठेवते.
‘आईस टी’ किती प्रमाणात प्यावी?
‘आईस टी’ पिण्याचा उत्तम मार्ग म्हणजे साखरेशिवाय आईस टी पिणे. दिवसातून फक्त एकदा आणि आठवड्यातून काही कप आईस टी प्यायल्याने तुमच्या आरोग्याला कोणताही धोका होत नाही. पण जास्त प्रमाणात साखर टाकून आईस टी प्यायल्याने आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो.
कशी बनवावी ‘आईस टी’ ?
तुम्हाला कोणत्याही रस्त्याच्या कोपऱ्यावर किंवा तुमच्या घराजवळ आईस टी सहजासहजी मिळणार नाही. पण आईस टी आपण घरी बनवू शकतो. आईस टी बनवणे फारच सोपं काम आहे. आईस टी बनवण्यासाठी सर्वप्रथम एका भांड्यात पाणी गरम करा. पाणी उकळल्यानंतर त्यात टी बॅग टाका. साधारण १० ते १५ मिनिटे पुन्हा पाणी उकळून घ्या. थोड्या वेळानंतर चहा थंड झाल्यावर त्यातमध्ये मध आणि बर्फाचे तुकडे टाका. आईस टी पिण्यापूर्वी त्यात थोडासा लिंबाचा रस टाका. तुमची आईस टी तयार झाली.
आईस टीचे दुष्परिणाम
जास्त प्रमाणात आईस टी प्यायल्याने किडनी स्टोनची समस्या उद्भवते. बर्याच वेळा लोक साखरेचा सोडा आईस टीमध्ये मिसळतात त्यामुळे शरीरात साखरेची पातळी वाढते. जास्त आईस टी प्यायल्याने कोलेस्ट्रॉल वाढते परिणामी स्ट्रोकचा धोका उद्भवतो. जास्त प्रमाणात आईस टी प्यायल्याने शरीरात कॅफिनचे प्रमाण वाढते, त्यामुळे झोप न लागणे, पोटदुखी, डोकेदुखी यांसारख्या समस्या उद्भवतात.