Healthy Tips | पुणे : अनेक वेळा चालताना किंवा उभं राहिल्यावर टाचदुखीची समस्या जाणवते. यावर काही घरगुती उपाय आहेत. ते उपाय केल्याने या समस्येपासून आराम मिळू शकतो.
जाणून घ्या टाचदुखीवर घरगुती उपाय –
- गोडेतेल आणि मीठ – गोडेतेल आणि मीठ एकत्र करून लेप तयार करा. हा लेप टाचेवर लावा आणि टाच सुती कापडाने बांधून ठेवा.
- बर्फ – बर्फाने टाचेचा दुखणारा भाग १० ते २० मिनिटे शेका. बर्फाच्या थंडाव्यामुळे टाचेच्या मांसपेशीत निर्माण झालेला ताण, त्रास कमी होण्यास मदत होते.
- वीट आणि रुई – विटेचा एक तुकडा थोडासा गरम करुन घ्या. त्या तुकड्यावर रुईचे पान बांधा आणि त्याचा शेक टाच दुखत असलेल्या भागावर द्या. यामुळे टाचदुखीला आराम मिळेल.
- कोमट पाणी आणि खडे मीठ – कोमट पाणी घ्या त्यात खडे मीठ टाका. नंतर या पाण्यात काही वेळ पाय टाकून बसा. असे केल्याने पायांना शेक मिळतो. तसेच टाचदुखीची समस्या कमी होते.
- मऊ चप्पल वापरा -टाचदुखी हा वाताचा एक प्रकार आहे. अनेक वेळा हिवाळा किंवा पावसाळा या ऋतूंमध्ये टाचदुखीची समस्या जाणवते. त्यामुळे मऊ चप्पल वापरा. टाचेला आराम मिळतो.
- व्यायाम – टाचदुखीवर उपाय म्हणून काही सोपे व्यायामही आहेत. तुम्ही भिंतीला हात टेकवून पायाच्या बोटांवर उभं राहावं. तसेच पायांच्या बोटांवर उभं राहून थोडसं चालण्याचा प्रयत्न करावा.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Health : आहारात करा मोड आलेल्या कडधान्यांचा समावेश, जाणून घ्या कडधान्य खाण्याचे फायदे
Health : स्माईल प्लीज ! हसण्याचे फायदे जाणून घ्या