Health Tips : कॅन्सर अर्थात कर्करोग. हा एक जीवघेणा आजार जरी असल्यास त्यावर वेळीच उपचार घेतले तर त्यातून रुग्णाला जीवदान मिळू शकते. पण हा आजार होऊच नये यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. आता हे शक्य होऊ शकते. काही घरगुती उपाय केल्यास याचा फायदा होऊ शकतो. तर जाणून घेऊ या त्याचविषयी…
ग्रीन टी पिणे फायद्याचे
ग्रीन टी पिणे आरोग्यासाठी चांगले मानले जाते. या चहात EGCG नावाचे अँटीऑक्सिडंट असते. जे मुक्त रॅडिकल्सशी लढण्यास आणि जळजळ कमी करण्यास मदत करते. (Health Tips) याशिवाय, टोमॅटोही गुणकारी मानले जातात. त्यात लायकोपीन आढळते. तसेच त्यात अॅंटीऑक्सिडंट गुणधर्मही आढळतात. यामुळे कर्करोगापासून लढण्यासाठी मदत मिळते.
फळांमध्ये व्हिटॅमिनची अधिक मात्रा
व्हिटॅमिन सी आणि मौसमी फळे खाल्ल्यामुळे कर्करोगाचा धोका टाळता येतो. फळांमध्ये व्हिटॅमिन सी, फायबर भरपूर प्रमाणात असतात. ते आरोग्यासाठी अतिशय चांगले मानले जाते. फळे खाऊन कर्करोगाचा धोका कमी करता येऊ शकतो.
द्राक्षं करतात विरोधी दाहक गुणधर्म
द्राक्ष आणि त्याच्या रसात रेसवेराट्रॉल नावाचे एक कंपाऊंड असते. रेसवेराट्रॉलमध्ये भरपूर अँटिऑक्सिडेंट आणि विरोधी दाहक गुणधर्म आहेत. (Health Tips) रेझव्हेराट्रोल पेशी कर्करोगामुळे होणाऱ्या नुकसानापासून शरीराचा बचाव करतात.
पाणी तर जीवनच
पाणी केवळ तहानच भागवते असे नाही. पाण्यामुळे मूत्राशयाच्या कर्करोगापासूनही बचाव होतो. आहारात द्रवपदार्थाचे प्रमाण वाढल्याने मूत्र जास्त होते आणि यामुळे मूत्राशय नेहमीच स्वच्छ असतो, यामुळे कर्करोग होण्याची शक्यता कमी होते.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Health Tips : रोगप्रतिकारक शक्ती वाढवायची कशी? जाणून घ्या ‘हे’ घरगुती उपाय…