Health पुणे : चुकीची जीवनशैली, लठ्ठपणा, स्नायूंचा ताण आणि दिवसभर बसून राहण्याची सवय अनेकदा पाठदुखीचे कारण बनते. काहीवेळा हे दुखणे इतके असते की त्या व्यक्तीला उठणे, बसणे किंवा चालणेही कठीण होते. (Health) त्यानंतर ती व्यक्ती या दुखण्यापासून आराम मिळवण्यासाठी औषधाचा आधार घेऊ लागते. परंतु वेदनांपासून मुक्त होण्यासाठी प्रत्येकवेळी औषध सेवन केल्याने तुमच्या आरोग्यालाही हानी पोहोचू शकते. (Health)
जर तुम्हालाही पाठदुखीचा त्रास होत असेल तर अशी काही योगासने आहेत, ज्यामुळे तुम्हाला फायदा होऊ शकतो. त्यामुळे या योगासनांचा तुमच्या दैनंदिन जीवनात नक्कीच समावेश करावा.
भुजंगासन :
भुजंगासन करण्यासाठी सर्वप्रथम पालथे पडून जमिनीवर झोपा आणि कोपर कंबरेजवळ ठेवा आणि तळवे वरच्या बाजूला ठेवा. यानंतर हळूहळू श्वास घेताना, तुमची छाती वरच्या दिशेने उचला आणि पोटाचा भाग हळूहळू उचलताना 30 सेकंद या स्थितीत राहा. आता श्वास सोडताना हळूहळू पोट, छाती आणि डोके जमिनीच्या दिशेने खाली करा.
शलभासन :
शलभासन देखील पोटावर झोपून केले जाते. यासाठी सर्वप्रथम पोटावर झोपावे, दोन्ही हातांचे तळवे मांड्याखाली ठेवावेत. त्यानंतर दोन्ही पायांचे घोटे एकत्र ठेवावेत, पायाची बोटे सरळ ठेवावीत. आता हळूहळू पाय वर करण्याचा प्रयत्न करा. दोन्ही पाय वरच्या दिशेने हालवत दीर्घ श्वास घ्या. काही सेकंद या स्थितीत राहिल्यानंतर, श्वास सोडताना पाय खाली आणा.
बालासन :
बालासन करण्यासाठी, सर्वप्रथम, गुडघ्यांवर बसताना, आपल्या शरीराचा सर्व भार टाचांवर ठेवा. आता दीर्घ श्वास घ्या आणि पुढील बाजूस वाकावे. हे करत असताना तुमच्या छातीला मांड्यांचा स्पर्श झाला पाहिजे याची विशेष काळजी घ्या. यानंतर आपल्या कपाळाने जमिनीला स्पर्श करण्याचा प्रयत्न करा. काही काळ या स्थितीत राहिल्यानंतर, सामान्य स्थितीत परत या. आपण ही प्रक्रिया 5 वेळा करू शकता. ही योगासने केल्यानंतर आराम मिळण्याची जास्त मदत होऊ शकेल.