Health पुणे : वाढत्या वयाचा परिणाम तिशीनंतर दिसू लागतो. एका अहवालानुसार, तिशीनंतर हृदयाचे जास्तीत ठोके दर मिनिटाला एकाने कमी होतात. वयातील हे बदल व्यायामाने कमी करता येतात. त्यात चालणे हे फायद्याचे मानले जाते. चालण्याचे अनेक फायदे आहेत. त्याने शरीराला ऊर्जाही मिळते. (Health)
वृद्धापकाळात काहींना हे शक्य होत नसतं. पण त्यांनी थोडं का होईना चालावं, असा सल्ला दिला जातो. यामुळे तुमचे संपूर्ण शरीर फिट राहते. चालणे हा एक साधा व्यायाम आहे. मात्र, ही एक प्रकारचा वेटलिफ्टिंग क्रियादेखील आहे. खरंतर आपण चालतो तेव्हा आपण आपल्या सभोवतालच्या नैसर्गिक गुरुत्वाकर्षणशीही स्पर्धा करतो. यामुळे आपली हाडे आणि स्नायू दोघांनाही फायदा होतो आणि संपूर्ण शरीराची कार्यक्षमता वाढते. (Health)
चालणं हे हृदयासाठी चांगले मानले जाते. चालण्यामुळे हृदयरोगाचा धोका कमी होतो. हाडांच्या आरोग्यासाठी देखील चालणे फायदेशीर आहे. कारण शरीराचं वजन आपण घेऊन दिवसभर चालत असतो. रोजच्या रोज चालण्याने स्नायू बळकट होतात. कॅलरीजही कमी होण्यास मदत होते. इतकेच नाहीतर ‘व्हिटामिन डी’च्या पातळीत सुधारणा होते. त्यामुळे नियमित चालावे, असा सल्ला दिला जातो.