पुणे, ता.१७ : साखर म्हटलं की आपल्याला त्याची गोडी लगेच लक्षात येते. इतर सर्व पदार्थांसह साखर हा घटक आपल्या शरीरासाठी आवश्यक असतो. रक्तामध्ये साखरेची पातळी वाढल्यास अनेक आजारांना एकप्रकारे आमंत्रणच मिळू शकते. त्यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न असतो. पण हे घरात राहून करता येऊ शकतं.
रक्तातील साखर वाढल्यास अनेक आजार उद्भवू शकतात. यामध्ये वजन वाढणे, स्थूलता, मधुमेह, हृदयविकार होण्याची शक्यता असते. शारीरिक आजारांसह मानसिक आजारांचाही समावेश होतो. जास्त शुगर इनटेकमुळे त्वचेशी संबंधित रोग होण्याची शक्यता असते. ही गंभीर स्थिती उद्भवू नये यासाठी शुगर इनटेक म्हणजेच साखरेच्या सेवनाचे प्रमाण कमी करणे आवश्यक असते.
आवळ्याच्या रसात हळद मिसळावी
जर तुम्ही आवळ्याचा रस गिलॉय आणि कोरफडीचा रस मिसळून रोज सेवन केले तर तुमची रक्तातील साखर नियंत्रणात राहते. याशिवाय आवळ्याच्या रसात हळद मिसळूनही सेवन करू शकता. याचाही तुम्हाला मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी फायदा होतो.
सफरचंदाचा रसही फायदेशीर
रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवण्यासाठी तुम्ही सफरचंद किंवा काकडीचा रस गाजराच्या रसात मिसळूनही सेवन करू शकता. तसेच पेरूची पानेही औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण असतात, त्यामुळे याचे सेवन केल्याने अनेक आजारांपासून बचाव होतो. यासोबतच तुमच्या शरीरातील ग्लुकोजची पातळीही नियंत्रणात राहते. यासाठी पेरूच्या पानांचा चहा बनवून पिऊ शकता. यामुळे तुमचे वजन कमी होण्यास आणि दृष्टी वाढण्यास मदत होते.
किमान सहा तास व्यायाम आवश्यक
व्यायाम हा शरीरासाठी आवश्यक असतो. नियमित व्यायामाने आजारांपासून दूर राहता येऊ शकते. आठवडाभरात किमान सहा तास व्यायाम करण्याचा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिला जातो. किमान 20 मिनिटे दीर्घ श्वासोच्छवासाचा व्यायाम किंवा प्राणायाम करावा, याने आरोग्याला चांगला फायदा होतो.