(Health News) पुणे : अंजीरमध्ये पोटॅशियम, सोडियम, फॉस्फोरिक ऍसिड, लोह आणि जीवनसत्त्वे असतात. अंजीर जर भिजवून खाल्ले तर त्याचे शरीराला अधिक फायदे मिळतात. जाणून घ्या भिजवलेले अंजीर खाण्याचे फायदे –
हृद्याचे आजार आटोक्यात राहतात…!
अंजीरमध्ये ओमेगा 3 आणि ओमेगा 6 घटक मुबलक असतात. त्यामुळे हृद्याचे आजार आटोक्यात राहतात.
रोगप्रतिकारक शक्ती
प्रथिने, जीवनसत्त्वे, कॅल्शियम आणि सल्फर सारखे गुणधर्म असतात. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.
थकवा, अशक्तपणा
भिजवलेले अंजीर खाल्ल्याने शरीराचा उत्साह वाढून मानसिक थकवाही दूर होतो.
हाडे मजबूत बनतात
अंजीरमध्ये कॅल्शियम घटक मुबलक असल्याने हाडांना मजबुती मिळते.
रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहते
अंजीरमधील पोटॅशियम घटक रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात.
मधुमेहावर गुणकारी
भिजवलेले अंजीर खाण्यामुळे टाइप -2 मधुमेहात रक्तातील ग्लुकोजच्या पातळीवर नियंत्रण मिळते. अंजीरमध्ये पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते. जे आपल्या शरीरात साखरेची पातळी नियंत्रित करते.
शरीरातील उष्णता कमी होते
अंजीर हे थंड असते. त्यामुळे शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी अंजीर उपयोगी आहे.
एनर्जी वाढते
अंजीरमुळे शक्ती, उर्जा वाढते सोबतच एजिंगचा त्रास कमी करण्यास मदत करतात.
केसांचे आरोग्य सुधारते
अंजीरमध्ये आढळणारे झिंक, कॉपर, सेलेनियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, बी व्हिटॅमिन, व्हिटॅमिन सी हे पोषक घटक केसांना निरोगी बनवतात. अंजीर केसांच्या वाढीसाठी उपयुक्त आहे. अंजीरमुळे केस बळकट, मॉइश्चराइझ आणि निरोगी बनतात.