संदीप टूले
Health News दौंड : पावसाळा आला की अनेक आजार डोके वर काढतात. पावसाळ्यातच हे आजार वाढीस लागतात जसे की, डोळ्याचे आजार, सर्दी, ताप, हिवताप, मलेरिया, डेंग्यू, टायफाईड इत्यादी आजार प्रामुख्याने पावसाळ्यामध्ये जोर धरताना दिसतात किंवा वाढीस लागतात. त्याचप्रमाणे आजच्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रासह दौंड तालुक्यामध्ये व स्थानिक गाव पातळीवर डोळ्यांचा फ्ल्यू या आजाराची लागण झाल्याचे फार मोठ्या प्रमाणात लक्षणे दिसत आहेत. (Health News)
यामध्ये लहान मुलांमध्ये लक्षणीय वाढ पाहायला मिळत असून, दवाखान्यामध्ये डोळे येणाऱ्या रुग्णाची संख्या जास्त आहे. त्यामुळे या डोळ्यांच्या फ्ल्यूवर काम करणारे औषधांचा (ड्रॉप) तुटवडा औषध दुकानामध्ये जाणवत आहे. एका बाजूने हा डोळ्यांचा फ्ल्यू आणि दुसऱ्या बाजूने यावरील औषधांचा तुटवडा यामुळे नागरिक त्रस्त आहे. औषधसाठी नागरिकांना वणवण फिरावे लागत आहे. (Health News)
नागरिकांनी काय करावे अन् काय करू नये?
नागरिकांनी मुळीच घाबरून जाऊ नये, घरातील ज्या व्यक्तींना, डोळ्यांची लागण झाली आहे. त्या व्यक्तीने इतर व्यक्तीपासून दूर राहावे. त्या व्यक्तीने डोळ्याला काळा चष्मा लावावा, डोळ्याला हात लावू नये किंवा चोळू नये, डोळ्याची लागण झालेल्या व्यक्ती वापरत असलेले रुमाल, टॉवेल, बेडशीट, साबण इतरांनी ते वापरू नये. त्यापासून संसर्ग होण्याची जास्त शक्यता आहे. (Health News)
तसेच आपण स्वतः नेत्ररोग तज्ञांकडे जाऊन सल्ला घ्यावा. उपचार करून औषधी नियमित घ्यावी. हा व्हायरस असून, याचे प्रमाण कमी होण्यासाठी कमीत कमी पाच ते सात दिवसांचा कालावधी लागतो. आपण स्वतः जाऊन मेडिकलमधील कोणतेही औषध घेऊ नये. डोळ्यात टाकू नये. यामध्ये प्रामुख्याने नेत्ररोग तज्ञाचा सल्ला जरूर घ्यावा, असे आवाहन अनेक डॉक्टरकडून करण्यात येत आहे. (Health News)