Health News : अनेकदा दातदुखीची समस्या चांगलाच त्रास देते. त्यातून काय करावे हे सूचत नसते. पण हिंग त्यावर उपाय असू शकते. हिंगामध्ये पाचक, उत्तेजक घटक असतात जे एंजाइम सक्रिय करतात. मसूर किंवा भाज्यांमध्ये चिमूटभर हिंगाचा वापर जेवणाची चव वाढवण्यासाठी आणि पचनशक्ती लक्षात घेऊन केला जातो.(Health News)
आयुर्वेदात हिंगाचे पाणी अनेक समस्यांवर फायदेशीर.
आयुर्वेदात हिंगाचे पाणी अनेक समस्यांवर फायदेशीर मानले गेले आहे. कानदुखी, दातांमधील पोकळी आणि रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठीही हिंगाचे पाणी फायदेशीर आहे. हिंगामध्ये चयापचय क्रिया सक्रिय करणारे घटक असतात. चयापचय वाढवण्यासाठी कोमट पाण्यात हिंग मिसळून प्या.(Health News)
याशिवाय हिंगामध्ये लठ्ठपणाविरोधी घटक असतात. हिंगाच्या पाण्यामुळे चरबी बर्न करण्यास मदत होते. ज्यामुळे वजन नियंत्रित राहते. हिंगामध्ये अँटी-व्हायरल आणि अँटी-इन्फेक्शन गुणधर्म आढळतात, ज्यामुळे कान दुखीत आराम मिळतो.
दोन चमचे खोबरेल तेलात चिमूटभर हिंग टाकून मंद आचेवर गरम करा. कोमट झाल्यावर त्याचे काही थेंब कानात टाका, दुखण्यात आराम मिळेल. दातांच्या पोकळीमुळे किंवा दुखण्याने त्रास होत असल्यास हिरड्यांभोवती चिमूटभर हिंग लावा. हा उपाय दिवसातून 2 ते 3 वेळा केल्याने आराम मिळू शकतो.