(Health News) पुणे : काजूमध्ये प्रथिने, लोह, जीवनसत्वे, पोटॅशिअम, झिंक, फॉस्फरस, मॅग्नेशिअम आणि कॉपर हे घटक मोठ्या प्रमाणात असतात. काजूचे नियमित सेवन त्वचेसाठी, डोळ्यांच्या आरोग्यासाठी गुणकारी आहे. मात्र एका व्यक्तीने दिवसातून फक्त 4 ते 5 काजू खावेत. काजू शक्यतो भिजवलेले खावेत. कारण भिजवलेले काजू लवकर पचतात. जाणून काजू खाण्याचे फायदे –
काजू बुध्दीवर्धक, स्मरणशक्ती वाढण्यासाठी उपयुक्त आहेत. काजूमध्ये ब्रेन बूस्टर पोषक घटक असतात, जे मेंदूची कार्यक्षमता वाढवण्यास आणि स्मरणशक्ती तीक्ष्ण वाढण्यासाठी मदत करतात.
काजूमध्ये मॅग्नेशिअम तसेच जीवनसत्वे मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे ब्लड प्रेशर नियंत्रणात राहण्यास मदत मिळते. तसेच काजूचे सेवन केल्यामुळे मायग्रेनच्या त्रास कमी होतो.
काजमूध्ये असणारे मोनोअनसॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेड फॅट बॅड कॉलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते. यामुळे हृदयरोगाचा धोका कमी होतो.
काजूमध्ये असणारे सेलेनिअम, झिंक, मॅग्नेशिअम, लोह आणि फॉस्फरस या पोषक तत्वांमुळे त्वचेला नुकसान पोहोचवणारे फ्री रेडिकल्सपासून संरक्षण होते. त्यामुळे त्वचा निरोगी होते आणि चमकदार बनते.
काजूमध्ये फायबरचे प्रमाणही चांगले असते, ज्यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते. मात्र यासाठी भिजवलेले काजू खावेत.
काजूमध्ये ल्यूटिन आणि ॲंटी-ऑक्सीडेंट गुण असतात. काजूतील पोषक गुणधर्मांमुळे, सूर्यकिरणांमुळे डोळ्यांची जी हानी त्यापासून संरक्षण मिळते. तसेच डोळ्यांचे आरोग्य सुधारते, दृष्टी चांगली होते.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…!
Health News : H3N2 एन्फ्लूएन्झा व्हायरसची लक्षणे, संसर्ग होण्याची कारणे आणि उपाय!
Entertainment News : नवीन प्रभाकर खलनायकाच्या भूमिकेत!
Beauty Tips : त्वचेच्या सौंदर्य वृद्धीसाठी मीठ उपयोगी, जाणून घ्या कसा करावा वापर!