Health पुणे : मशरूम म्हणजेच आळिंबी ही एक प्रकारची कवक किंवा बुरशी आहे. मशरूमच्या लाखो प्रजाती आहेत. त्यातील सुमारे 300 खाद्य प्रजाती आहेत. (Health) त्यातील भारतात नेहमीच्या बाजारपेठेत 4 ते 6 व्यावसायिक पातळीवर उपलब्ध आहेत व ज्यांची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. मशरूमचे आरोग्यास बरेच फायदे आहेत, असे अनेक संशोधनातून आढळते. (Health)
मशरूम जास्त मेद, कॅलरी किंवा सोडियम प्रदान न करता जेवणात मसालेदार चव आणतात. मशरूममध्ये अनेक पोषक घटक असतात व त्यामुळे ते आरोग्यासाठी लाभदायक ठरतात. असे इतर पोषकतत्त्वांची श्रेणी प्रदान करतात. जे त्यांच्या इतर फायद्यांसह हृदयाच्या आरोग्यासाठी योगदान ठरते आणि शरीराला कर्करोगापासून वाचवू शकतात. त्यातील पोषक घटक मात्र मशरूमच्या प्रकारावर अवलंबून असतात.
बहुतेक सर्व खाद्य मशरूममध्ये प्रथिने, जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट (सेलेनियम, जीवनसत्त्व क व कोलीन) विपुल प्रमाणात असतात. सुमारे 70 ग्रॅम वजनाच्या एक कप कापलेल्या कच्या मशरूममध्ये जवळजवळ 1 ग्रॅम खाद्य तंतू (फायबर) असते. मशरूममध्ये ‘ब’ जीवनसत्त्वे भरपूर असतात. आहारातील फायबर ‘प्रकार-2-मधुमेह’ व बद्धकोष्ठतेसह अनेक आरोग्य स्थिती नियंत्रणात ठेवण्यास मदत करू शकते.
मशरूममधील खाद्य तंतू, पोटॅशियम आणि जीवनसत्त्व ‘क’ हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्यासाठी योगदान ठरते. पोटॅशियम रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करू शकते आणि यामुळे उच्च रक्तदाब, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगाचा धोका कमी होऊ शकतो.