Health पुणे : तुम्ही बौद्धिकरित्या स्वस्थ नसाल तर त्याचा सरळ परिणाम तुमच्या कामावर व वागणुकीवर पडतो. बौद्धिकरित्या स्वतःला फिट ठेवण्यासाठी जिज्ञासू वृत्ती असणे अत्यंत आवश्यक आहे. कारण असे लोक सतत काहीना काही क्रिएटिव्ह करण्याबद्दल विचार करत असतात. यामुळे तुमच्या विचारांमध्ये व्यापकता येते व मेंदू कार्यक्षम बनतो. (Health)
ब्रेन एक्सरसाईज महत्त्वाची
अनेक संशोधनातून हे समोर आले आहे की, गेम्स खेळल्याने मेंदू स्वस्थ राहतो. कारण गेम्स खेळताना मेंदूला आव्हान मिळते. सुडोकू आणि चेससारख्या खेळांमुळे वेगाने विचार करण्याची क्षमता वाढते तसेच मनोरंजनही होते. रोज केवळ 15 ते 20 मिनिटे असे गेम खेळल्याने याचा फायदा होतो. हे एक प्रकारचे ब्रेन एक्सरसाईजच आहे. (Health)
व्यायाम महत्त्वाचा
शारीरिक व्यायाम ही एक प्रकारची बौद्धिक कसरतच असते. यादरम्यानच्या हालचालीचा सरळ परिणाम मेंदूवर होतो. नियमित व्यायाम केल्याने आपण मानसिकरीत्याही सुदृढ राहतो. फक्त ठराविक वेळेनंतर वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम करावेत, याचा अधिक चांगला परिणाम होतो. याशिवाय, दररोज मेडिटेशनची सवय असलेला माणूस हा बौद्धिकरित्या इतरांपेक्षा अधिक स्वस्थ असतो. यामुळे शारीरिक आरोग्य चांगले राहते व झोपही चांगली येते. (Health)
हेल्दी डाएट घ्यावा
बौद्धिकरित्या स्वस्थ राहण्यासाठी असा आहार घ्यावा जो शरीराबरोबरच मेंदूसाठीही फायदेशीर राहिल. विशेष करून ऑलिव्ह ऑइल व मासे मेंदूसाठी हेल्थफुल असतात. तसेच आपले अनुभव मित्रांसोबत शेअर करा. ज्यामुळे तुमची स्मरणशक्ती चांगली राहिल. तसेच गोष्टी वाचण्याच्या सवयीमुळेही तुम्ही मानसिकरित्या सुदृढ राहतात. काही लोक आपण वाचलेल्या गोष्टी इतरांना अतिशय मनोरंजक पद्धतीने सांगतात, ज्यामुळे त्यांची स्मरणशक्ती चांगली राहते. (Health)