पुणे : Health – तांब्याच्या भांड्यातील पाणी पिणे त्वचेच्या आरोग्यासाठी चांगले असते. तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी कफ, पित्त, वातहारक असते. तांब्याच्या भांडे नेहमी स्वच्छ असावे. (Health) तांब्याच्या भांड्याचा उपयोग केवळ पाणी साठवण्याकरिता करावा. त्यात लिंबू सरबत यांसारखी पेय ठेऊ नयेत. जाणून घ्या तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्याचे फायदे – (Health)
तांब्याच्या भांड्यातील पाण्यामध्ये अँटी ऑक्सिडेंट्स
तांब्याच्या भांड्यातील पाण्यामध्ये अँटी ऑक्सिडेंट्स असतात. त्यामुळे कर्करोगाचा धोका कमी होतो. सकाळी उठल्यानंतर तांब्याच्या भांड्यातील पाणी पिल्याने दिवसभर शरीर ऊर्जावान राहते तसेच फ्रेश राहते.
तांब्याच्या भांड्यातील पाणी नियमित पिणे पोटाच्या आरोग्यासाठी अतिशय चांगले आहे. पोटदुखी, गॅस, अॅसिडिटी आणि बद्धकोष्ट, अतिसार यांसारख्या समस्यांवर तांब्याच्या भांड्यातील पाणी गुणकारी आहे.
तांब्यातील जंतूनाशक गुणधर्मामुळे पोटातील जिवाणूंचा नाश होतो. जळजळ होण्याची समस्या कमी होते. रोज सकाळी तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी प्यायल्यास त्वचेचा पोत व आरोग्य सुधारण्यास मदत होते.
तांब्याच्या भांड्यातील पाणी पोट साफ ठेवण्यास मदत करते. त्यामुळे चेहऱ्यावर पुरळ, पुटकुळ्या येत नाहीत. तसेच त्वचा नितळ बनते.तांबे शरीरात मेलॅनीनच्या निर्मितीमध्ये मदत करते. तांबे त्वचेच्या पेशींची निर्मिती करण्यास मदत करते. तांब्यातील अॅन्टीऑक्सिडंट आणि नवीन पेशी निर्माण करण्याची क्षमता यामुळे चेहर्यावरील सुरकुत्या कमी होण्यास मदत होते.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Health : शरीरात हिमोग्लोबिनची कमतरता जाणवत असेल तर या पदार्थांचा आहारात करा समावेश
Health News : हृदयाच्या आरोग्यासाठी काजू उपयुक्त, जाणून घ्या काजू खाण्याचे फायदे
Health News | वजन कमी करण्यासाठी, चिया बिया गुणकारी; जाणून घ्या चिया बिया खाण्याचे इतर फायदे