आपलं आरोग्य सुदृढ असावं यासाठी प्रयत्न केला जातो. आरोग्यासोबतच शारीरिक गोष्टींकडेही विशेष लक्ष दिले जाते. थोडं जरी कमी-जास्त झालं तरी आपण ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. त्यात अंगावर आलेले चामखीळ आपण घालवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असतो. मात्र, असे काही घरगुती उपाय आहेत ते केल्यास नक्कीच फायदा होऊ शकतो.
कोरफडचा वापर चेहऱ्यावरील चामखीळ घालवण्यासाठी उत्तम उपाय आहे. कोरफड जेलमध्ये मॅलिक ऍसिड असते. जे चामखीळवर प्रभावशाली ठरते. याचे अँटीव्हायरल, अँटिबॅक्टेरियल आणि अँटिबायोटिक गुण चामखीळ त्वचेवर सुकवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात. हे जेव्हा तुम्ही लसूणसह मिक्स करता, तेव्हा याचा अधिक चांगला प्रभाव पडतो. तसेच टी ट्री ऑईल हेदेखील फायद्याचे मानले जाते. टी ट्री ऑईल आणि चंदनाचे तेल एकत्र मिक्स करून घ्या. हे मिश्रण तुम्ही रोज चामखीळावर लावा. साधारण 12 आठवडे तुम्ही याचा रोज वापर केल्यास, तुमच्या शरीरावरील चामखीळ जाण्यास मदत मिळते.
दोरा बांधून चामखीळ घालवता येऊ शकते. दोरा बांधणे हादेखील एक चामखीळ घरगुती उपाय आहे. दोरा बांधल्यामुळे चामखीळ असणाऱ्या ठिकाणचा रक्तप्रवाह कमी होतो आणि थोड्याच दिवसात चामखीळ गळून पडण्यास मदत मिळते. मात्र, दोरा बांधताना अगदी करकचून बांधला जाणार नाही आणि त्वचेला त्याचा त्रास होणार नाही याची तुम्हाला काळजी घेणे गरजेचे आहे. अन्यथा तुम्हाला त्वचेचा वेगळा त्रास अथवा समस्या सहन करावी लागण्याची शक्यता आहे. on the