आपल्या शरीराला सुमारे 20% पाणी अन्नातून मिळते, तर 80% पाणी आपण पिण्याची गरज असते. जर तुम्ही कमी पाणी पीत असाल, तर तुम्ही अशा पदार्थांचा आहारामध्ये समावेश करायला पाहिजे. ज्यामध्ये पाण्याची चांगली मात्रा असेल. अशी फळं खायला हवीत. त्यांची माहिती आज जाणून घेऊ.
काकडी : काकडी सर्वांत जास्त पाणी असणार पदार्थ मानला जातो. त्यात सुमारे 96% पाणी असते. त्यामुळे काकडी खाणे तिची ताजीतवानी चव उन्हाळ्यात खूप फायदेशीर असते. दररोज काकडी खाल्ल्याने लोकांना हायड्रेटेड राहण्यास मदत मिळू शकते.
मुळा : मुळा, जो अनेकदा सॅलडमध्ये खाल्ला जातो, त्यातही 95% पाणी असते. मुळा केवळ पाण्याने भरपूर नाही, तर तो व्हिटॅमिन सी आणि फायबरचा देखील चांगला स्रोत आहे. उन्हाळ्यात मुळा खाल्ल्याने तुम्हाला निरोगी आणि हायड्रेटेड राहण्यास मदत मिळू शकते.
टोमॅटो : टोमॅटो, प्रत्येक ऋतुत खाल्ला जाणार टोमॅटो उन्हाळ्यात अधिक फायदेशीर मानला जातो. टोमॅटोमध्ये 94% पाणी असते. त्यात लाइकोपीन नावाचे अँटीऑक्सिडेंट देखील असते, जे आपल्या पेशींना नुकसानीपासून वाचवते आणि शरीर निरोगी ठेवते.
टरबूज : उन्हाळ्यात टरबूज खाणे फायदेशीर मानले जाते. टरबूजमध्ये सुमारे 92 टक्के पाणी असते. त्यामुळे हायड्रेशनला मदत होते.
स्ट्रॉबेरी : स्ट्रॉबेरीमध्येही पाणी भरपूर प्रमानात असते. 90 टक्क्यांपेक्षा जास्त पाणी स्ट्रॉबेरीमध्ये असते. यामुळे ते उन्हाळ्यात आरोग्यदायी ठरते.
तुम्ही उन्हाळ्यात या पदार्थांचा तुमच्या आहारात समावेश करू शकता. ज्यामुळे तुमच्या शरीरातील पाण्याची पातळी वाढण्यास मदत होईल.