आयुर्वेदानुसार अंजीर हे एक अत्यंत पौष्टिक आणि औषधी गुणधर्म असलेले फळ आहे. अंजीर ताजे आणि सुक्या अशा दोन्ही स्वरूपात खाल्ले जातात. अंजीर खाण्याचे तुमच्या शरीराला अनेक आरोग्यदायी फायदे होतात.
अंजीर खाण्याचे आरोग्यदायी फायदे:
1. अंजीर खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते: अंजीरमध्ये फायबर्स (आहारीय तंतू) भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे बद्धकोष्ठता दूर करण्यास मदत होते आणि पचनक्रिया सुधारते.
2. हृदयासाठी उपयुक्त: अंजीरमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते, यामुळे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास आणि कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत होते. त्यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारते.
3. हाडे मजबूत होतात: अंजीरमध्ये कॅल्शियम, फॉस्फरस आणि मॅग्नेशियम असते, यामुळे हाडाची मजबुती वाढते व ऑस्टिओपोरोसिसपासून संरक्षण होते.
4. वजन नियंत्रित होते: फायबर्समुळे पोट भरल्यासारखे वाटते, ज्यामुळे जास्त खाण्याची इच्छा कमी होते. त्यामुळे वजन नियंत्रणात राहते.
5. रक्तातील साखर नियंत्रित: सुकवलेले अंजीर मध्यम ग्लायसेमिक इंडेक्स असलेले असते, त्यामुळे ते मधुमेहींसाठी प्रमाणात खाल्ले तर फायदेशीर ठरते.
6. त्वचेसाठी फायदेशीर: अंजीरमध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात जे त्वचेचे वृद्धत्व रोखतात, त्वचेला चमकदार ठेवतात.
7. रक्तशुद्धी: अंजीर रक्त शुद्ध करण्यास मदत करतो आणि त्वचेचे विकार दूर होण्यास उपयोगी ठरतो.
8. पुरुषांच्या प्रजनन क्षमतेस मदत: आयुर्वेदानुसार अंजीर हे नैसर्गिक कामोत्तेजक मानले जाते. ते वीर्यवृद्धी आणि लैंगिक आरोग्यास मदत करू शकते.
अश्या प्रकारे सुकवलेले अंजीर प्रमाणातच खावेत, कारण त्यात साखर जास्त असते. मधुमेह किंवा वजनवाढीच्या तक्रारी असणाऱ्यांनी वैद्यकीय सल्ल्यानेच अंजीराचे सेवन करावे.
(टीप: सदर माहिती वाचकांसाठी पुरवण्यात आली आहे. पुणे प्राईम न्यूज यातुन कोणताही दावा करीत नाही)