आयुर्वेदानुसार कढीपत्ता अनेक आजारांवर रामबाण उपाय ठरू शकतो असे म्हटले आहे. आजच्या काळात मधुमेह, रक्तदाब आणि अनियंत्रित जीवनशैलीमुळे पचन, झोपेचा अभाव यासारख्या समस्या वाढल्या आहेत. मात्र, कढीपत्त्याचे नियमित सेवन केल्याने या समस्यांपासून आराम मिळु शकतो.
कढीपत्ता खाण्याचे फायदे
कढीपत्त्यामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई सोबत मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि लोह यासारखे पोषक घटक असतात. डोळ्यांव्यतिरिक्त त्वचा, पचनाशी संबंधित समस्या जसे की बद्धकोष्ठता, पोट फुगणे तसेच मधुमेह, रक्तदाब इत्यादी समस्यावर रामबाण उपाय ठरू शकतो. जर कढीपत्ता रिकाम्या पोटी चावला तर डोळ्यांशी संबंधित समस्या दूर होतात. त्यामुळेडोळ्यांच्या स्नायूंना आराम मिळतो.
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. पुणे प्राईम न्यूज यातून कोणताही दावा करत नाही. )