सागर जगदाळे ; भिगवण
Bhigvan News : भिगवण, (पुणे) : जलजीवन मिशन अंतर्गत मदनवाडी नळपाणी पुरवठा योजनेच्या जलस्त्रोतावरुन सत्ताधारी व विरोधक आमने सामने आले असून ग्रामसभेत खडकवासला कालव्याचा मंजूर करण्यात आलेला जलस्त्रोत बदलून पुन्हा नव्याने ग्रामसभेमध्ये तो उजनी जलाशयातून करण्याचा सत्ताधाऱ्यांनी घाट घातला आहे. हा घाट कशासाठी घातला जातोय याचे कोडे मात्र विरोधकांना पडले आहे. (Bhigvan News)
सत्ताधाऱ्यांनी केलेल्या कृतीमुळे विरोधकांनी तीव्र विरोध दर्शविला असून. सदरचा ग्रामसभेचा ठराव बेकायदेशीर असून ठरावाच्या विरोधात मदनवाडी बचाव कृती समितीच्यावतीने बोंबाबोंब आंदोलन करत ग्रामपंचायत प्रशासनाचा निषेध नोंदविला आहे. १९ कोटी रुपये खर्चाची ही जलजीवन योजनेचे नुकतेच काम सुरू झाले आहे. ४ मार्च २०२३ रोजीच्या ग्रामसभेत पाणी पुरवठा योजनेचा जलस्त्रोत खडकवासला कालव्यावरुन घेण्याचे बहुमताने मंजूर करण्यात आले. मात्र, या उजनीचे पाणी कमालीचे प्रदूषण आहे. त्यामुळे या ठरावाला ७ जूनच्या ग्रामसभेत बदल करण्यात आला. (Bhigvan News)
परंतु हा ठराव बेकायदेशीर आहे. ग्रामसभेने केलेला ठराव किमान ६ महिन्याच्या आत बदलणे हे कायद्याचे उल्लंघन करणारे असून ठराव रद्द करण्याची प्रखर मागणी यावेळी रंगनाथ देवकाते व तुकाराम बंडगर यांनी यावेळी केली. त्याचप्रमाणे उजनी जलाशयाचे पाणी पिण्यास अपायकारक असून त्यामुळे त्वचेचे विकार तसेच कॅंसरसारख्या भयंकर आजाराला सामोरे जावे लागेल यामुळे त्याऐवजी खडकवासलाच्या कॅनॉलवरुन पाण्याचा जलस्त्रोत करावा अशीही मागणी केली. (Bhigvan News)
मदनवाडी ग्रामपंचायत बेकायदेशीर कामे करत असुन ग्रामपंचायतीच्या कामकाजावर मदनवाडी बचाव कृती समिती लक्ष ठेवून असुन मदनवाडी ग्रामस्थांवर होणारा अन्याय थांबावा व गावात होणाऱ्या चुकीच्या कामकाजाला मदनवाडी बचाव कृती समिती आळा घालण्यासाठी तत्पर असुन आंदोलनाच्या मार्गाने ग्रामस्थांना न्याय मिळवुन देणार असल्याचे कृती समितीचे समन्वयक दादासाहेब थोरात यांनी सांगितले. (Bhigvan News)
दरम्यान, मदनवाडी ग्रामस्थांनी बोंबाबोंब आंदोलन करत प्रशासनाचा निषेध व्यक्त केला या आंदोलनाची योग्य दखल न घेतल्यास भविष्यात तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला. यावेळी धनाजी थोरात, आबासाहेब बंडगर, अतुल देवकाते, राजेंद्र देवकाते, शरद चितारे, दीपक बंडगर, शिवाजी देवकाते यांनी आपआपले मनोगत व्यक्त केले. (Bhigvan News)
यावेळी रंगनाथ देवकाते, तुकाराम बंडगर, विश्वास देवकाते, संजय देवकाते, रोहिदास देवकाते, बाळासो सवाणे, रमेश नरुटे, लाला कुंभार, माऊली मारकड, रवींद्र देवकाते, सतिश बंडगर, सतिश सकुंडे, गणेश थोरात, धैर्यशील मारकड, संजय कदम आदी उपस्थित होते. (Bhigvan News)