Beauty Tips : प्रेमाचे, मैत्रीचे, शांततेचे प्रतीक असणारा गुलाब सौंदर्यवर्धकदेखील आहे. त्वचेचे सौंदर्य (Beauty Tips) खुलविण्यासाठी गुलाब गुणकारी आहे. जाणून घ्या मुलायम आणि चमकदार त्वचा बनविण्यासाठी गुलाब फेसपॅक कसे बनवावे याविषयी माहिती –
दही आणि गुलाबपासून बनवलेला फेसपॅक…
गुलाबाच्या पाकळ्यांची पेस्ट बनवून त्यात एक चमचा दही मिक्स करून चेहऱ्याला लावावे. फेसपॅक वाळल्यानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवावा. दह्यामध्ये लॅक्टिक ॲसिड असते, ज्यामुळे त्वचेवर नैसर्गिकरित्या चमक येते.तसेच गुलाब पाकळ्यांमुळे त्वचा मुलायम बनते.
गुलाब आणि चंदन फेसपॅक
गुलाब पाकळ्यांची वाटून पेस्ट बनवा. त्यामध्ये थोडं कच्च दूध आणि चंदनाची पावडर घालून मिश्रण नीट मिक्स करा. तयार झालेला फेसपॅक चेहऱ्यावर लावा. १५-२० मिनिटांनी चेहरा स्वच्छ धुवा. गुलाब आणि चंदनमुळे त्वचेला थंडावा मिळतो तसेच त्वचा मुलायम आणि चमकदार बनते.
दूध व गुलाब पाकळ्यांचा फेसपॅक
एक गुलाब घेऊन त्याच्या पाकळ्यांची वाटून पेस्ट बनवा. नंतर एका वाटीमध्ये गुलाब पाकळ्यांची पेस्ट, दोन चमचे बेसन आणि कच्चे दूध घालून व्यवस्थित मिक्स करावे. हे मिश्रण चेहऱ्याला लावावे. पॅक वाळल्यानंतर साध्या पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…
Health News : उन्हाळ्यात शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी खा भिजवलेले अंजीर, आरोग्यदायी फायदे
Health News | साखर खाण्याची सवय सोडविण्यासाठी ‘या’ उपायांचा अवलंब करा
Health News : अधिक प्रमाणात लसूण खाल्यामुळे शरीराचे होऊ शकते नुकसान, जाणून घ्या
Health News : H3N2 एन्फ्लूएन्झा व्हायरसची लक्षणे, संसर्ग होण्याची कारणे आणि उपाय