कोल्हापूर Ban Caffeinated Cold Drinks : कॅफिनयुक्त थंड पेयाचे सेवन केल्यामुळे मुलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. (Ban Caffeinated Cold Drinks) त्यामुळे नवे पारगांव (ता. हातकणंगले,जिल्हा कोल्हापूर) ग्रामपंचायतीने अनोखा निर्णय घेऊन गावात थंडपेय विक्री घालण्यास बंदी (Ban Caffeinated Cold Drinks) घातली आहे. (Ban Caffeinated Cold Drinks) नवे पारगांव ग्रामपंचायतीने या आशयाचे परिपत्रक काढून गावातील दुकानदारांना दिले आहे. (Ban Caffeinated Cold Drinks)
मुलांच्या आरोग्यासाठी नवे पारगांवने घेतला निर्णय
नवे पारगांव ग्रामपंचायतीची नुकतीच ग्रामसभा पार पडली. कॅफिनयुक्त पेयापासून लहान मुलांच्या आरोग्यास निर्माण होणारा धोका व तरूणांच्या वाढणाऱ्या व्यसनाधिनता या गोष्टींना आळा घालण्यासाठी ग्रामपंचायतीने अशा थंड पेयाच्या विक्रीवर बंदी घालण्याचा ठराव मंजूर केला. व अशा प्रकारच्या कोणत्याही थंड पेयाची दुकानदाराने आपल्या गावामध्ये विक्री करू नये. असा निर्णय घेण्यात आला.
त्यानंतर ग्रामपंचायतीने एक परिपत्रक जारी केले. या परिपत्रकात असे म्हटले आहे की, दुकानामध्ये विक्रीसाठी असणाया थंड पेयामध्ये कॅफिन वापरलेले अनेक थंडपेय आहेत. की जसे स्टिंग,फ्रेश एनर्जी, चार्ज वगैरे अश्या प्रकारच्या अनेक कंपन्या मार्केटमध्ये आहेत. हे कॅफिनयुक्त थंड पेय गावामधील १८ वर्षा खालील लहान मुलांच्यामध्ये पिण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आढळून आले आहे. या पेयापासून लहान मुलाच्या आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.
यासर्व गोष्टीचा विचार करून अशा पेयापासून लहान मुलांच्या आरोग्यास निर्माण होणारा धोका व तरूणांच्या वाढणाऱ्या व्यसनाधिनता या गोष्टीना आळा घालण्यासाठी ग्रामपंचायतीने या पेयाच्या विक्रीवर बंदी घातली आहे. आणि अशा प्रकारच्या कोणत्याही थंड पेयाची आपल्या गावामध्ये विक्री करू नये. तसेच या प्रकारच्या थंडपेयाची जाहीरात आपल्या दुकानासमोर करू नये.असे परिपत्रक गावातील दुकानदारांना दिले आहे.
दरम्यान, जर गावातील दुकानदाराने कॅफिनयुक्त थंडपेय गावात विक्री करताना आढळून आल्यास. त्याच्यावर कायदेशीर कडक कारवाई करण्यात येणार आहे. असेही नवे पारगांव ग्रामपंचायतीने सांगितले आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Kolhapur News : दोन सख्ख्या भावांनी अवघ्या पाच मिनिटांच्या अंतराने घेतला जगाचा निरोप…!
Kolhapur Crime : धक्कादायक!!! सख्ख्या भावाने काढला बहिणीचा काटा, तीक्ष्ण हत्याराने केला खून..!