Saturday, July 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Baramati Crime News : शेअर मार्केटमधील नफ्याचे अमिष दाखवत मोरगावातील एकाची ४० लाखांची फसवणूक ; वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल..

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Tuesday, 9 May 2023, 11:29

Baramati Crime News | बारामती, (पुणे) : शेअर मार्केटमध्ये माझ्याकडे रक्कम गुंतवल्यास चांगला नफा मिळवून देतो असे सांगत मोरगाव (ता. बारामती) येथील एका व्यक्तीची ४० लाख रुपये घेत फसवणूक केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला.

विनय पुरुषोत्तम वर्टी (रा. डोंबिवली, जि. ठाणे) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी हेरंब दिगंबर सासवडे (रा. मोरगाव, ता. बारामती) यांनी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हेरंब सासवडे हे भांडी विक्रीचा व्यवसाय करून त्यावर उपजिविका करतात. दोन वर्षांपूर्वी कोरोना काळात त्यांचा व्यवसाय अडचणीत आल्याने ते साडू जीनदत्त हरीभाऊ झरकर (रा. खोपोली, ता. खालापूर, जि. रायगड) यांच्याकडे गेले होते. त्यावेळी साडूने त्यांची ओळख शिरिष मुकुंद बिवरे यांच्याशी करून दिली होती. बिवरे यांनी माझ्या ओळखीतील विनय वर्टी यांच्याकडे शेअर मार्केटमध्ये गुंतवल्यास ते गुंतवणूकदाराला चांगला मोबदला देतात, असे सांगितले होते. त्यानुसार वर्टी यांची भेट घालून देण्यात आली.

 

शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवण्यासाठी सासवडे यांनी मयुरेश्वर पतसंस्थेला घर गहाण ठेवून ५० लाख रुपयांचे कर्ज घेतले. त्यापैकी प्रत्येकी १५ लाखांचे दोन चेक, ५ लाख रुपये आरटीजीएसद्वारे व अन्य रक्कम वर्टी यांना रोखीने देण्यात आली. त्यानंतर महिन्याभराने फिर्यादीने वर्टी यांची भेट घेतली असता त्यांनी दोन लाख रुपये किमतीचे दोन चेक दिले. ते चेक फिर्यादीने भरले असता पुरेशी रक्कम नसल्याने वटले नाहीत. वर्टी यांना संपर्क केला असता त्यांनी खोपोलीत येण्यास सांगितले.

दरम्यान, सासवडे यांनी भेट घेतली असता ४ लाख रुपयांचा चेक त्यांना देण्यात आला. तो खात्यावर भरल्यावर बाऊन्स झाला. त्यानंतर वर्टी यांचा संपर्क बंद झाला. शिरिष बिवरे व अन्य लोकांनी संपर्क केला असता त्यांनीही वर्टी कुठे आहेत हे माहित नसल्याचे सांगितले. वर्टी हे भेटत नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे फिर्यादीच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी या प्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिसांत फिर्याद दिली आहे.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

नीट पेपरफुटीपाठोपाठ शिक्षणात आणखी एक महाघोटाळा! १९० कोटींच्या बनावट ‘शालार्थ आयडी’ प्रकरणी माजी शिक्षणाधिकाऱ्यांना अटक

Friday, 24 July 2026, 22:58

सोशल मीडियाची मैत्री पडली महागात! शिक्षिकेच्या घरातून १४ लाखांचा ऐवज लांबवून प्रियकर पसार

Friday, 24 July 2026, 22:23

पावसाचा जोर ओसरणार की संकट कायम? राज्यात ३ ठिकाणी ‘ऑरेंज’ तर ७ जिल्ह्यांत ‘यलो’ अलर्ट जारी!

Friday, 24 July 2026, 21:43

पेपरफुटी करणाऱ्यांना आता १० वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा अन् १० कोटींचा दंड! कॅबिनेटचा सर्वात मोठा निर्णय

Friday, 24 July 2026, 21:02

शिरूरमधील प्रकार! खरेदीच्या बहाण्याने सराफ दुकानात शिरल्या अन् चार महिलांनी हातचलाखीने दागिने लांबवीले….

Friday, 24 July 2026, 20:19

पत्नीचे उत्पन्न जास्त असेल तर पोटगीचा अधिकार नाही! मुंबई उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक आणि मोठा निर्णय

Friday, 24 July 2026, 19:36
Next Post

Ban Caffeinated Cold Drinks : स्टिंग, फ्रेश एनर्जी, चार्ज यांसारखे उत्तेजित पेयांच्या विक्रीस ग्रामपंचायतीने घातली बंदी, कोल्हापूर जिल्ह्यातील नवे पारगांव ग्रामपंचायतीने घेतला अनोखा निर्णय...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.