लहू चव्हाण
पाचगणी : रामवाडी (ता. जावळी) येथील संदीप महादेव सणस यांचा सहा वर्षाचा छोटा चिमुकला आरूष संदीप सणस याला यकृताचा गंभीर आजार झाला असून यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करणे अत्यावश्यक झाले आहे.
ॲपोलो हॉस्पिटल घणसोली नवी मुंबई येथे या चिमुकल्याच्या यकृत प्रत्यारोपणाकरीता २० लाखांची गरज असून सर्वांच्या दातृत्वाची साथ मिळायला हवी. याकरिता रामवाडीचे सरपंच श्रीरंग गलगले यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे समस्त जावळीकरांना आर्थिक मदतीसाठी साद घातली आहे.
आरूष संदीप सणस या सहा वर्षीय चिमुकल्याला यकृताचा गंभीर आजार उद्भवला असून त्याला सध्या नवी मुंबई घनसोली येथील ॲपोलो हॉस्पिटल येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. त्याच्या यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्याकरिता २० लाख रुपयांची नितांत गरज आहे.
याकरिता सामाजिक दातृत्व समाजसेवी संस्था, त्याचबरोबर दानशूर व्यक्ती यांनी पुढे येत सढळ हाताने मदत करण्याची खरी आवश्यकता आहे. आज हा चिमुकला बेडवर पडून आहे. त्याच्या यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रियासाठी आपण नक्कीच खारीचा वाटा उचलून लहान मोठी मदत करू शकता.
आज ही मदत त्यांच्या कुटुंबीयांकरीता लाख मोलाची ठरणार आहे. प्रत्येकाने आपले आर्थिक स्वरूपात योगदान द्यावे अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
आज संपूर्ण रामवाडी गाव सणस कुटुंबाच्यापाठी एकदिलाने उभा राहिला आहे. त्याचबरोबर समस्थ जावळीकरांना मदतीसाठी त्यांनी साद घातली आहे. यात आशा संकटसमयी एकमेकांना साथ देत प्रत्येकाने थोडा खारीचा वाटा उचलला तर नक्कीच आरूषचे यकृत प्रत्यारोपण होणार आहे.
आरुषच्या कुटुंबाशी संपर्क साधून मदतीचा हात द्यावा. असे आवाहन सरपंच श्रीरंग गलगले यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.
संपर्क : संदीप सणस
मोबाईल नंबर 95948 82608