(Urfi Javed) मुंबई : शिवसेनेच्या (शिंदे गटाच्या)प्रवक्त्या व नेत्या शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे यांच्या माॅर्फ व्हिडिओच्या प्रकरणावरून चांगलेच राजकारण तापलेले असताना, चर्चेत असलेली उर्फी जावेदने एंट्री घेतली आहे. या प्ररकणात आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच सरकारने या प्रकरणी एसआयटीची स्थापना केली आहे. त्यामुळे हे प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
उर्फी जावेदची बोचरी टीका…!
भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी शीतल म्हात्रे यांना पाठिंबा देणारा एक व्हिडीओ शेअर केला आहे. मात्र, चित्रा वाघ यांच्या या भूमिकेवरून उर्फी जावेद हिने त्यांच्यावर बोचरी टीका केली आहे. उर्फी म्हणाली की, ‘ती वेळ विसरलात का ? जेव्हा माझ्या कपड्यांमुळे, माझ्या चारित्र्यावर बोट दाखवलं होते.
यावरूनच मला तुरुंगात पाठवण्याची मागणी देखील केली होती. इतकंच नाही, तर माझं डोकं फोडण्याची उघड धमकीही देण्यात आली. वाह वाह वाह. हिपोक्रसीच्या पण काहीतरी मर्यादा असतात, हे कोणी तरी या बाईला सांगा.’ असा टोला लगावला आहे.
उर्फी आणि चित्रा वाघ यांचा वाद राज्याला चांगलाच माहिती आहे. यावरुन किती राजकारण पेटले होते हेही जनतेला चांगलेच ठाऊक आहे. त्यावेळी दोन्ही बाजूंनी जोरदार प्रहार करण्यात आले होते. तत्पूर्वी चित्ता वाघ यांनी शीतल पुरता मर्यादीत नाहीचं, राजकारणात काम करणाऱ्या कुठल्याही महिलेसोबत भविष्यात या गोष्टी घडू शकतील. मुंबई पोलिसांना आवाहन आहे, या हरामखोरांना सोडू नकाचं. पण यांचा करविता धनी कोण आहे, त्याला शोधून काढत त्याच्या आधी मुसक्या आवळा.’अशा शब्दात समर्थन दिले होते. पण आता उर्फीच्या एन्ट्रीने कहानीत ट्विस्ट आला आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…!
Entertainment News : नवीन प्रभाकर खलनायकाच्या भूमिकेत!
Pune Crime News | पुणे : चायनिज सेंटर चालकांमध्ये वाद; लोखंडी रॉडने मारहाण!