मुंबई, ता.१२ : बॉलिवूडचा पहिला ब्लॉकबस्टर सिनेमा ज्याने अभिनेते अशोक कुमार यांचे नशीबच बदलले. होय, आपण बोलत आहोत ‘किस्मत’ या सिनेमाविषयी. या सिनेमाने एक नाही, दोन नाही तर तब्बल 32 वर्षे प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. अभिनेते अशोक कुमार यांच्या 1943 मध्ये आलेल्या ‘किस्मत’ या सिनेमाला चांगलीच पसंती मिळाली.
‘किस्मत’ सिनेमाच्या यशाचे रहस्य ही त्याची थीम होती. एकीकडे अशोक कुमार यांचा हा सिनेमा बोल्ड थीमवर बनलेला हिंदी सिनेमा ठरला. ज्यामध्ये नायक तीन वेळा जेलमधून बाहेर येतो. तर कुमारी मुलगी जी लग्नाआधी गर्भवती होते. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर जोरदार धडाका लावला होता. त्यावेळी जग दुसऱ्या महायुद्ध पाहत होते तर दुसरीकडे अशोक कुमार यांच्या ‘किस्मत’ या सिनेमाने भारतीय चित्रपटसृष्टी स्वातंत्र्यापूर्वीच पुढे नेली.
बॉक्स ऑफिसवर यश मिळवणारा सिनेमा दीर्घकाळ चित्रपटगृहांमध्ये चालत राहतो, असे अनेकदा दिसून येते. अशोक कुमार यांच्या ‘किस्मत’पासून त्याची सुरुवात झाल्याचे पाहिला मिळाले. रिलीज झाल्यानंतर ‘किस्मत’ अशा पद्धतीने यशस्वी ठरला की त्याची चर्चा बराच काळ सुरू राहिली. या सिनेमाने खरोखरच अशोक कुमार यांची ‘किस्मत’च बदलली.