(Sushmita Sen) पुणे : बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेनला Sushmita Sen ‘आर्या ३’ च्या शूटिंग दरम्यान हृदयविकाराचा झटका गेल्या महिन्यात आला होता. अभिनेत्रीने इंस्टाग्राम पोस्ट शेअर करत ही माहिती २ मार्चला चाहत्यांना दिली होती. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर अँजिओप्लास्टीही करण्यात आल्याचे सुष्मिताने सांगितले आहे. यातून बरे होत असल्याचे सुष्मिता म्हणाली होती. याबाबत आता सुश्मिताचा सहकलाकार विकास कुमारने खुलासा केला आहे.
यावेळी बोलताना विकास म्हणाला, “आम्ही जोधपूरमध्ये ‘आर्या ३’ वेब सीरिजमधील काही ॲक्शन सीन्सचं शूटिंग करत होतो. याचदरम्यान सुश्मिताला हृदयविकाराचा झटका आला होता. सेटवर शूटिंगदरम्यान सुष्मिताची प्रकृती बिघडली होती. त्यानंतर काही मेडिकल टेस्ट करण्यात आल्या. तेव्हा सुश्मिताला हृदयविकाराचा झटका आल्याचे समजलं.”
दरम्यान,‘ आर्या’ ही सुष्मिताची गाजलेली वेब सीरिज आहे. या वेब सीरिजचे दोन सीझन प्रदर्शित झाले असून तिसऱ्या सीझनचं शूटिंग सुरू आहे. सुश्मिता सेन ‘आर्या’मध्ये मुख्य भूमिकेत आहे. तर अभिनेता विकास कुमार या वेब सीरिजमध्ये एसीपी युनूस खानची भूमिका साकारत आहेत.
सेटवर कोणालाच नव्हती कल्पना…!
“सुश्मिताला हृदयविकाराचा झटका आल्याचं टीममधील कोणालाच माहीत नव्हतं. तिला स्वत:लाही याबाबत काहीही माहिती नव्हती. मेडिकल टेस्टच्या रिपोर्टनंतर सुश्मिताला याबाबत कळलं. पण तिने हृदयविकाराचा झटका आल्याचं कोणालाही सांगितलं नव्हतं. सुश्मिताच्या पोस्टमधूनच तिला हृदयविकाराचा झटका आल्याचं आम्हाला समजलं. सुश्मिताला याबाबत कोणत्याही प्रकारचा ड्रामा करायचा नव्हता, म्हणून तिने कोणालाही सांगितलं नाही,” असंही पुढे विकास म्हणाला. दरम्यान, आता सुष्मिताची प्रकृती पूर्वीपेक्षा व्यवस्थित आहे.