ShahRukh Khan Accident लॉस अँजेलिस- बॉलिवूडचा किंग शाहरुख खानचा अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये शूटिंगदरम्यान अपघात झाला आहे. (ShahRukh Khan Accident) शाहरुखच्या नाकाला दुखापत झाल्याने रक्तस्त्राव सुरू झाला होता, रक्तस्त्राव थांबवण्यासाठी किंग खानवर छोटी शस्त्रक्रिया करावी लागली आहे. असे डॉक्टरांनी सांगितले आहे. (ShahRukh Khan Accident)
रिपोर्टनुसार “SRK एका प्रोजेक्टसाठी लॉस एंजेलिसमध्ये शूटिंग करत होता. आणि शेवटी त्याचे नाक दुखू लागले. त्याला रक्तस्त्राव होऊ लागला आणि त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
रक्तस्त्राव थांबवण्यासाठी किंग खानवर छोटी शस्त्रक्रिया करावी लागली आहे. काळजी करण्यासारखे काहीही नाही. असे डॉक्टरांनी सांगितले आहे. ऑपरेशननंतर शाहरुखच्या नाकावर पट्टी बांधली आहे. शाहरुख खान आता आपल्या देशात परतला आहे आणि घरी विश्रांती घेत आहे
दरम्यान, शाहरुखच्या नाकावर पट्टी बांधलेली दिसली होती. शाहरुख खान आता भारतात परतला आहे आणि घरबसल्या रिकव्हरी करण्याचा प्रयत्न करत आहे. आतापर्यंत शाहरुख किंवा त्याच्या टीमने या अपघाताबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य जारी केलेले नाही.