Ramayana : मुंबई : बॉलीवूडमध्ये सध्या ऐतिहासिक आणि पौराणिक चित्रपटांची क्रेझ आहे. आधी आदिपुरूष आणि आता रामायण चित्रपटाचा बोलबाला सुरू आहे. दिग्दर्शक नितेश तिवारी आता करत असलेल्या ‘रामायण’या चित्रपटाची सर्वत्र चर्चा आहे. या चित्रपटात रणबीर कपूर प्रभू श्रीराम यांच्या भूमिकेत, साई पल्लवी सीतेच्या भूमिकेत तर केजीएफ स्टार यश हा रावण, सनी देओल हनुमान म्हणून चित्रपटात दिसणार आहे.
या चित्रपटाच्या कास्टिंगवरुन मधू आणि नमित यांच्यात बरेच मतभेद सुरू झाले, यानंतर आता समोर आलेल्या वृत्तानुसार मधू मंटेना यांनी या चित्रपटापासून निर्माता म्हणून वेगळं व्हायचा निर्णय घेतला आहे. सध्या नमित आणि त्यांच्या कंपनीच या चित्रपटावर काम करत असून नितेश तिवारी हे याचं दिग्दर्शन करणार आहेत. मीडिया रीपोर्टनुसार गेल्या सहा महिन्यांपासून या चित्रपटाच्या प्री-प्रोडक्शनवर काम सुरू आहे. मधु मंटेना या चित्रपटाची निर्मिती करणार होते. हा चित्रपट व्हीएफएक्सवर पूर्णपणे बेतलेला असल्याने त्यांनी जगातील सर्वोत्तम व्हीएफएक्स कंपनीचे मालक नमित मल्होत्रा यांना चित्रपटाशी जोडले. नमित यांच्या कंपनीने कित्येक हॉलिवूड चित्रपटांसाठी तसेच रणबीर कपूरच्या ‘ब्रह्मास्त्र’साठी काम केलं आहे.
या चित्रपटात आधी सीतेच्या भूमिकेत आलिया भट्टसुद्धा दिसणार होती, पण काही कारणास्तव तिने या चित्रपटातून काढता पाय घेतला आहे. रणबीर कपूर या चित्रपटासाठी चांगलीच मेहनत घेत आहे, इतकंच नव्हे तर तो यासाठी मांसाहार व मद्यपानही बंद करणार असल्याची चर्चा आहे. तसेच या चित्रपटाचं चित्रीकरण मार्च २०२४ पासून सुरू होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. अद्याप याबद्दल अधिकृत घोषणा झालेली नसली तरी लवकरच निर्माते याबद्दल माहिती देतील असं सांगण्यात येत आहे.