लहू चव्हाण
Pachgani News : पाचगणी : गोंदवले खुर्द (ता. माण) येथे आयोजित केलेल्या राज्यस्तरीय सन्मित्र नाट्य महोत्सव २०२३ या स्पर्धेमध्ये सातारा येथील रंगप्रवाह नाट्य संस्थेच्या ‘पौर्णिमा’ या नाट्य प्रयोगाने बक्षिसांची लयलूट केली. प्रथम क्रमांकाचे ३१ हजार रुपयांचे रोख पारितोषिक, मानाच्या फिरत्या करंडकासह, सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, सर्वोत्कृष्ट बालकलाकार आदी महत्त्वाची बक्षिसे पटकावून ‘पौर्णिमा’ने या स्पर्धेत आपली छाप पाडली.
महत्त्वाची बक्षिसे पटकावून स्पर्धेत बाजी मारली
गेल्या ३० वर्षांपासून अखंडपणे नाट्यरसिकांची नाट्यरुची जपण्याबरोबरच नवख्या कलाकारांना आपली कलाकृती सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या सन्मित्र नाट्य मंडळ आयोजित नाट्य स्पर्धा यावर्षी देखील प्रेक्षकांच्या मांदियाळीत मोठ्या उत्साहात पार पडली. (Pachgani News) हौशी कलाकारांनी सादर केलेल्या दोन अंकी नाटकांना प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला. आठवडाभर चाललेल्या या महोत्सवात राज्यभरातील विविध नाट्यसंस्थांनी आपले प्रयोग सादर केले. यातून प्रथम क्रमांकाचा मान रंग प्रवाह नाट्य संस्था, सातारा यांच्या ‘पौर्णिमा’ या नाटकाला मिळाला. ३१ हजार रुपये रोख, फिरता करंडक, चषक, प्रमाणपत्र असे या पारितोषिकाचे स्वरूप आहे.
‘पौर्णिमा’ नाटकाचे दिग्दर्शक करणाऱ्या इम्रान मोमीन यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, ‘जगन्या’चे पात्र साकारणाऱ्या निलेश गुरव यांना सर्वोत्कृष्ट अभिनेता, ‘शारदा’ची भूमिका साकारणाऱ्या हरहुन्नरी कलाकार सोनाली ओंबळे हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, ‘पौर्णिमा’ची भूमिका साकारणाऱ्या वैष्णवी जाधव (Pachgani News) हिला सर्वोत्कृष्ट बालकलाकार यांच्यासह प्रशांत इंगवले याला सर्वोत्कृष्ट रंगभूषा, प्रज्ञा चव्हाण, शितल लांडगे, अमृता क्षीरसागर आणि नियती पवार यांना सर्वोत्कृष्ट वेशभूषा अशी बक्षिसे मिळाली. रोख रक्कम, प्रमाणपत्र आणि करंडक असे बक्षिसाचे स्वरूप आहे.
स्पर्धेत द्वितीय क्रमांकाचे २५ हजार रुपयांचे पारितोषिक जागृती कला नाट्य संस्था, कुसवडे (सातारा) यांच्या ‘आम्ही दोघेच राहायचो घरात’ या नाट्यप्रयोगाला मिळाले. तर तृतीय क्रमांकाचे २० हजार रुपयांचे पारितोषिक सप्तश्रृंगी एंटरटेनमेंट पुणे यांच्या ‘अनंत कोटी ब्रमांड नायक’ यांना आणि चतुर्थ क्रमांकाचे १५ हजार रुपयांचे पारितोषिक आझाद हिंद प्रतिष्ठान, सातारा यांच्या ‘दिली सुपारी बायकोची’ या नाट्यप्रयोग आणि जाई वल्लरी प्रोडक्शन, ठाणे यांचा ‘तुमच्यासारखे आम्ही’ या दोन नाट्यप्रयोगांना विभागून देण्यात आले.
स्पर्धेचा पारितोषिक वितरण कार्यक्रम अॅड. प्रभाकर कारंडे यांच्या अध्यक्षतेखाली दहिवडी नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष धनाजी जाधव, सहायक पोलीस निरीक्षक सुरेशकुमार सरतापे यांच्या हस्ते आणि कमलाकर शेडगे, जगन्नाथ भारती, कमलाकर माने यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. (Pachgani News) समारंभ यशस्वी करण्यासाठी सन्मित्र नाट्य मंडळाचे अध्यक्ष अर्जुन शेडगे, यांच्यासह रमेश खांडेकर, बंडू पोळ, विजय डालपे, सुनील पोळ, चंदू लोखंडे, डॉ. पालवे, डॉ. प्रदीप पोळ, युवराज पोळ, डॉ. डोंबे, अजितकुमार भोंडवे, विजय अवघडे, अनिल कदम यांच्यासह गोंदवले खुर्दमधील ग्रामस्थ, नाट्यप्रेमींनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिजाबा शेडगे यांनी केले. तर आभार अर्जुन शेडगे यांनी मानले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pachgani News : ‘पाचगणी’ सोसायटीने नागरिकांना उन्नतीची संधी दिली- आशिष दवे
Pachgani News : पाचगणी रोटरी क्लबच्या वतीने शाळांना डिजिटल रूमच्या साहित्याचे वाटप
Pachgani News : मैदानी खेळांना प्रोत्साहन देणे ही काळाची गरज – मुख्याधिकारी निखिल जाधव