Sunday, June 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Daund News : देलवडीच्या जय मल्हार विद्यालयात ढोल-लेझीमच्या तालावर कर्मवीरांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 22 September 2023, 17:05

गणेश सुळ

Daund News  : केडगाव : देलवडी येथील रयत शिक्षण संस्थेच्या जय मल्हार विद्यालयाच्या वतीने कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त, फुलांची आकर्षक सजावट तसेच रंगीबेरंगी पताका व फुग्यांची सजावट केलेल्या बैलगाडीमधून कर्मवीर भाऊराव पाटील व लक्ष्मीबाई पाटील यांच्या प्रतिमेची पारंपरिक ढोल-लेझीमच्या तालावर भव्य मिरवणूक काढण्यात आली.

 

या वेळी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन शाळा समितीचे अध्यक्ष बाळासाहेब वाघोले यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर देलवडी गावांतर्गत भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूक मुख्य चौकात आल्यानंतर ग्रामस्थांच्या वतीने सरपंच निलम काटे यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन मिरवणुकीचे स्वागत केले. तर मुलांनी लेझीम व झांज पथकातील खेळ सादर करुन उपस्थितांची मने जिंकली.

कर्मवीर जयंतीनिमित्त विद्यालयात विविध स्पर्धा

मिरवणुकीदरम्यान ‘कर्मवीर भाऊराव पाटलांचा विजय असो’, ‘स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद’ अशा विविध घोषणा देत मुलांनी परिसर दणाणून सोडला. याप्रसंगी देलवडी गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झालेले गणेश खेडेकर, (Daund News ) गणेश शेलार, सुवर्णा शेलार, मनिषा कर्णवर, माधुरी शेलार, उज्वला चांदगुडे यांचा सन्मान करण्यात आला. तसेच ‘महापारेषण’मध्ये नियुक्ती झालेली भाग्यश्री शेलार व वन विभागात भरती झालेला गणेश कर्नवर यांनाही या वेळी सन्मानित करण्यात आले.

विद्यालयात कर्मवीर जयंतीनिमित्त निबंध, वक्तृत्व, चित्रकला, रांगोळी, क्रिकेट, कबड्डी, मॅरेथॉन अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले. विद्यालयातील मुख्याध्यापक कदम व अध्यापक वर्ग यांनी झांजपथक व लेझीम पथकासाठी मार्गदर्शन केले. मिरवणुकीनंतर मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी शिवाजी वाघोले, विकास शेलार, (Daund News ) बाळासाहेब वाघोले, राजाभाऊ काटे, गोपाळ शेलार, दत्ताभाऊ शेलार, गणुमामा लव्हते, दत्तात्रय शेलार, भानुदास टकले, राजाभाऊ शेलार, बाप्पूराव शेलार, महादेव शेलार, माधव टकले, पांडुरंग शेलार, तात्या काळे, किशोर शेलार, सागर निगडे आदी मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक लोंढे यांनी केले. तर आभार देशमुख यांनी मानले. मान्यवरांच्या वतीने उपस्थितांना अन्नदान करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Daund News : दौंड रेल्वे स्टेशनवर ४ लाख रुपयांचा गांजा जप्त ; स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखेची व दौंड पोलिसांची कामगिरी..

Daund News : मुळा-मुठेच्या पाणीपातळीत घट, पिकांना फटका; बाप्पांच्या कृपेने आनंदघन बरसेल, बळीराजाची अपेक्षा

Daund News : दौंडमध्ये यंदाचा गणपतीबाप्पा पावणार कोणाला?; राज्यात सत्तांतर झाल्याने गणेशोत्सवाला विशेष महत्व

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

जागतिक सायकल दिनानिमित्त फुरसुंगीच्या सायकलपटूंची पुणे ते गोवा सायकल राईड..

Sunday, 7 June 2026, 18:06

गॅस दरवाढीवरून राजकारण पेटलं! शरद पवारांचा केंद्र सरकारवर निशाणा, तर फडणवीसांकडून धोरणाचं समर्थन

Sunday, 7 June 2026, 18:02

सुशिक्षित बेरोजगार तरुणांना फसवले! आयटी नोकरीचे खोटे आश्वासन अन् 43 लाखांची फसवणूक; कंपनी मालकावर गुन्हा दाखल

Sunday, 7 June 2026, 17:20

केडगावमध्ये बेकायदेशीर गर्भपात प्रकरण; केडगाव येथील लवंगारे डॉक्टरसह उरुळी कांचन येथील डॉ. तुकाराम मोटे यांच्यावर गुन्हा दाखल..

Sunday, 7 June 2026, 16:57

पुण्यात लेडी ‘डॉन’चा खाकी गणवेशात राडा! लष्कर परिसरात पीएसआय असल्याचे सांगून केली फसवणूक; ‘नेमप्लेट’वरून फुटले बिंग

Sunday, 7 June 2026, 16:33

‘आम्हाला सल्ला देण्याची गरज नाही’; रोहित पवारांना सुनील तटकरेंनी सुनावलं; राज्यसभेच्या उमेदवारीवरून जुंपली

Sunday, 7 June 2026, 16:00
Next Post

Pachgani News : गोंदवले येथील राज्यस्तरीय नाट्य महोत्सवात साताऱ्याच्या 'पौर्णिमा'ची बाजी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.