Kareena Kapoor On Raha : मुंबई : राहा रणबीरसारखी दिसते की आलीयासारखी दिसते? हे जाणून घेण्याची उत्सूकता सर्वांनाच आहे. आत्तापर्यंत अनेक वेळा तिच्या लूकविषयी विचारणा झाली. मात्र, त्यावर ना कधी रणबीर किंवा आलीयाने भाष्य केले. मात्र, त्यावर आता करीनाने भाष्य केले आहे. नुकतेच कॉफी विथ करण ८ मध्ये करीना आणि आलियाने हजेरी लावली होती. तेव्हा करीनाने राहाच्या लुकबाबत खुलासा केला आहे.
कॉफी विथ करण सीझन ८ च्या नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये नणंद भावजयच्या ( आलिया आणि करिना ) जोडीने हजेरी लावलेली. त्यांनी आपल्या व्यावसायिक तसेच वैयक्तिक आयुष्यातील बरेच खुलासे केले. शोमध्ये करणने पहिल्यांदा आलियाला राहाविषयी विचारले, आलिया म्हणाली, अनेकदा मी सकाळी राहासोबत बसते आणि तिच्याशी बोलते. मी तिच्यासाठी आणखी काय करु शकते याचा मी विचार करत असते.
करीनात्या राहा रणबीरसारखी दिसते असे म्हटले आहे. तेव्हा आलिया म्हणाली की, असे फक्त करीनालाच वाटते. ज्यावर करीनाने करणला सांगितले, पण खरंच ती रणबीर दिसते, कारण रणबीर लहान असताना तसाच दिसायचा. रणबीर आणि करीना चुलत भाऊबहिण आहेत. मात्र, ते एकत्रच लहानाचे मोठे झाले. राहाच्या बाबतीत आलिया म्हणाली की, राहा कधी कधी पूर्णपणे रणबीरसारखी नाही दिसत, मला वाटते राहा मध्ये प्रत्येकाचा एक अंश आहे.