Gautami Patil’s Program : सांगोला : प्रसिध्द नृत्यांगना गौतमी पाटील हिची संपूर्ण महाराष्ट्राला भुरळ पडली आहे. कार्यक्रमाला गौतमीच पाहिजे असा सध्या हट्ट तरुणाईमध्ये पाहयला मिळत आहे. गौतमी म्हटले की वाद हा आलाच असे जणू आता समीकरण झाले आहे. त्यामुळे तिच्या कार्य़क्रमाला पोलिसांची परवानगी घ्यावीच लागते. अशा एका गौतमीच्या कार्य़क्रमासाठी एका पठ्ठ्याने तब्बल १०६ पोलिसांचा फौजफाटा तैनात केला होता. त्याचीच चर्चा आता राज्यभर रंगली आहे. (Gautami Patil’s Program in police protection)
पोलिस बंदोबस्तासाठी सुमारे पाच लाख रुपयांचा खर्च
राष्ट्रीय समाज पक्षाचे सरचिटणीस सोमा मोटे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त तरुणाईमध्ये सध्या प्रचंड लोकप्रिय ठरलेल्या गौतमी पाटीलच्या गाण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन केले. (Gautami Patil’s Program)
गौतमी पाटलाच्या अगोदर झालेल्या कार्यक्रमातील तरुणाईच्या राड्यामुळे या पठ्ठ्याने चक्क १०६ पोलिस बंदोबस्तासाठी सुमारे पाच लाख रुपयांचा खर्च केला; परंतु कार्यक्रम व्यवस्थितच केला.
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचे नियोजन जरी करण्यात आले असले तरी आयोजकांना गर्दीवर नियंत्रण करून कार्यक्रम यशस्वी होईल याची खात्री नव्हती. या अगोदर गौतमीच्या अनेक कार्यक्रमांमध्ये तरुणांच्या उत्साहाला उधाण आल्याने अनेक ठिकाणी राडा झाला होता.
काही ठिकाणी पोलिसांनी लाठीचार्ज करून आयोजकांवर गुन्हाही दाखल केला होता. परंतु असा कोणताही अनुचित प्रकार होऊ नये, परंतु कार्यक्रम तर करायचा, अशा इराद्याने सोमा मोटे यांनी पोलिस बंदोबस्तासाठी अर्ज दिला.(Gautami Patil’s Program) या गर्दीत राडा होऊन कार्यक्रमात व्यत्यय येऊ नये म्हणून १०० पोलिस कर्मचारी आणि सहा अधिकारी अशा एकूण १०६ पोलिसांचा बंदोबस्त घेतला व कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडलाच.
नाद केला पण वाया नाही गेला…!
गौतमी पाटीलच्या राज्यभरातील कार्यक्रमांना होणारी गर्दी नेहमीच चर्चेचा विषय बनलेली असते. परंतु राज्यात प्रथमच कार्यक्रम शांततेत पार पाडण्यासाठी १०० हून अधिक पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांचा फौजफाटा घेरडी येथे तैनात केल्याने घेरडी गावाला अक्षरशः पोलिस छावणीचे स्वरूप आले होते. (Gautami Patil’s Program) कार्यक्रमाच्या कित्येक पटीने अधिक रक्कम पोलिस बंदोबस्तासाठी मोजल्याने घेरडी येथील गौतमी पाटीलच्या या अनोख्या कार्यक्रमाची संपूर्ण राज्यभर चर्चा रंगली आहे. कार्यक्रम करायचा तोपण गौतमी पाटीलचाच, असे ठरवून कार्यक्रमही केला आणि व्यवस्थित पारही पाडला. त्यामुळे सध्या ‘नाद केला, पण वाया नाही गेला’ अशी चर्चा सुरू झाली आहे.
कार्यक्रमाच्या आयोजकांनी कार्यक्रम सुरळीत पार पाडण्यासाठी पोलिस बंदोबस्त मागितला होता. यासाठी सुमारे चार लाख ७५ हजार रुपये बंदोबस्ताचे पैसेही भरले. या कार्यक्रमासाठी १०६ पोलिस कर्मचारी व अधिकाऱ्यांसह हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यात आला.
– अनंत कुलकर्णी, पोलिस निरीक्षक, सांगोला
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :