(Gautami Patil ) बीड : बायकोचा वाढदिवस आहे यासाठी वेगळाच काहीतरी कार्यक्रम केला पाहिजे यासाठी आष्टी तालुक्यातील निमगाव बोडखा येथील एका तरुणाने चक्क नृत्यांगना गौतमी पाटील (Gautami Patil ) हिचा कार्यक्रम आयोजित केला होता. वाढदिवसानिमित्त गौतमी पाटीलचा शो हा राज्यातला पहिलाच प्रयोग ठरला आहे. गौतमी पाटील हिच्या हस्ते केक कापून हा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी माजी मंत्री सुरेश धस देखील उपस्थित होते.
किरण गावडे यांच्या पत्नी प्रगती गावडे असे या दाम्पंत्याचे नाव असून पत्नीच्या वाढदिवसानिमित्त गावडे यांनी चक्क नृत्यांगना गौतमी पाटील हिचा कार्यक्रम आयोजित केला होता.
सध्या नृत्य सादरीकरणामुळे पूर्ण महाराष्ट्रभर गौतमी पाटील हे नाव प्रसिद्ध झालं आहे. यात गौतमी पाटील आतापर्यंत अनेक वेळा नेटकऱ्यांमध्ये ट्रोल देखील झाली. गौतमी पाटीलला सोशल मीडियावर माफी मागावी लागली आहे. सातारा जिल्ह्यात गौतमी पाटीलचा कार्यक्रम एका चिमुकल्याच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आला होता. तसेच साताऱ्यातील जावळी तालुक्यात गौतमी पाटीलचा कार्यक्रम बैलाच्या वाढदिवसाला देखील आयोजित करण्यात आला होता.
दरम्यान, या दोन गोष्टींच्या पुढं जाऊन बीडच्या किरण गावडे या युवकानं त्याच्या पत्नीच्या वाढदिवसानिमित्त गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. नवदांपत्य म्हटलं की वाढदिवस वेगवेगळ्या पद्धतीनं साजरे केले जातात आणि त्यातच आष्टी तालुक्यातील एका दाम्पत्याने आगळावेगळा वाढदिवस साजरा केला आहे.
बायकोच्या वाढदिवसाचा केक कापण्यासाठी चक्क गौतमी पाटील..!
आपल्या बायकोचा वाढदिवस आहे यासाठी वेगळाच काहीतरी कार्यक्रम केला पाहिजे यासाठी चक्क किरण गावडे यांनी गौतमी पाटील यांच्या नृत्य सादरीकरणाचा कार्यक्रम आयोजित केला. त्याचबरोबर बायकोच्या वाढदिवसाचा केक कापण्यासाठी चक्क गौतमी पाटील यांनाच बोलवण्यात आलं होतं. यावेळी मोठ्या प्रमाणात रोषणाई करण्यात आली होती. तब्बल पाच किलो पेक्षा अधिक मोठा केक आणला होता. राजकीय मंडळी देखील या गौतमी पाटील च्या उपस्थितीनिमित्त आणि वाढदिवसानिमित्त या ठिकाणी आलेले पाहायला मिळाले. मात्र, आगळ्यावेगळ्या ह्या वाढदिवसामुळे सध्या महाराष्ट्रभर या कुटुंबाची सध्या चर्चा होताना पाहायला मिळत आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…!
Gautami Patil News : गौतमी पाटीलचा हाय झुमका वाली पोरं; गाण्यावर हटके ठुमका, हा डान्स एकदा बघाच
Gautami Patil : खर्शी तर्फ कुडाळमध्ये आजीच्या पप्पीने भारावली गौतमी पाटील!
Gautami Patil : गौतमी पाटीलचा तो व्हिडिओ पुन्हा चर्चेत; एसआयटी चौकशीची मागणी!