(Gautami Patil) पिंपरी : लावणीला एक परंपरा आहे. लावणीचे अनेक प्रकार आहेत. ती सादर करताना अंभर कपडे घालूनच सादर करावी. गौतमी पाटील ही जी लावणी सादर करते, ती लावणी नसून डीजे डान्स आहे. अशी जहरी टीका लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी गौतमीवर केली. तसेच त्या माझ्याकडे आली तर त्यांना मी लावणी शिकवू शकते असेही यावेळी पुणेकर यांनी सांगिले.
चिंचवड येथे २५ आणि २६ मार्चला राज्यस्तरीय महालावणी स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेची माहिती देण्यासाठी रविवारी चिंचवड येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी सुरेखा पुणेकर बोलत होत्या. भाजपच्या आमदार उमा खापरे, महापालिकेच्या माजी विरोधी पक्षनेत्या सुलभा उबाळे यावेळी उपस्थित होत्या.
पुणेकर म्हणाल्या, ”कलावंत आपली कला सादर करुन पोट भरण्यासाठी धडपडत असतो. मात्र जे करायचे आहे, ते चांगले करावे.” कलावंत असलेल्या तरुणींनी अंगभर कपडे घालून लावणीमधून कला सादर करावी. त्यामुळे ही कला जिवंत राहण्यास मदत होईल. त्यासाठी लावणी आजच्या पिढीपर्यंत पोहचविली पाहिजे. मात्र, काही कलावंत तसे करताना दिसत नाही. मात्र, आपण लावणीची विटंबना होऊ देणार नाही. असेही त्यांनी यावेळी सांगितले.
पारंपरिक कला लोकांपर्यंत पोहचवण्याचे आवाहन…
तमाशाचे आजकाल स्वरुप बदलत चालले आहे. माशाचा आर्केस्ट्रा झाला आहे. तमाशातील वग हा प्रकार मागे पडत आहे. याला कलाकारच जबाबदार आहेत.
लावणीमध्ये सवाल-जवाब हा प्रकार सध्या पहायला मिळत नाही. त्यासाठी कलावंतांनी प्रयत्न केले पाहिजे. आपण आपली पारंपरिक कला लोकांपर्यंत पोहचविली पाहिजे, असे आवाहन सुरेखा पुणेकर यांनी केले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…!
Entertainment News : नवीन प्रभाकर खलनायकाच्या भूमिकेत
Entertainment News : मराठी अल्बम सृष्टीत संगीतकार प्रशांत नाकतीच्या मी सिंगलचा आला तिसरा पार्ट!