Flim News यवत : सध्या मराठी सिनेविश्वातील वातावरण ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाने बहरून आलं आहे. (Flim News) या चित्रपटाला प्रेक्षकांनी पोस्टरपासून ते ट्रेलरपर्यंत उचलून धरलं होतं. ‘केदार शिंदे’ यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून, सध्या प्रेक्षकांनी चित्रपटगृहात सिनेमा पाहण्यासाठी मोठी गर्दी होत आहे. यवत (ता. दौंड) महिलांनी सुद्धा हा चित्रपट पाहण्यासाठी उत्स्पुर्त प्रतिसाद दिला आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत असून चित्रपटाची गाणी गुणगुणताना देखील नागरिक पाहायला मिळत आहेत. (Flim News)
जूनला प्रदर्शित झालेल्या ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाचे सुरुवातीला पहिल्या आठवड्यात दिवसातून फक्त दोन वेळा प्रदर्शित केला जात होता. परंतु महिलांचा चित्रपटाला प्रतिसाद वाढत असल्याने सध्या चित्रपटाचे दिवसातून चार वेळा प्रदर्शित केला जात असून दिवसातून प्रदर्शित होणाऱ्या चारही शोसाठी महिलांचा तुफान प्रतिसाद मिळत असल्याचे गुंजन चित्रपटगृहाचे मालक संतोष खराडे यांनी सांगितले ‘
झिम्मा या चित्रपटानंतर महिलांनी ‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहात मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवली आहे. विशेष म्हणजे महिलावर्ग मोठ्या संख्येने हा चित्रपट पाहायला गर्दी करत असून महिलांचे बचत गट, मैत्रिणी, महिला मंडळ अशा ग्रुपसोबत सिनेमा पाहण्यासाठी सहभाग दर्शवत आहेत.
या सिनेमामध्ये रोहिणी हट्टंगडी, सुकन्या मोने, वंदना गुप्ते, सुचित्रा बांदेकर, दीपा परब आणि शिल्पा नवलकर मुख्य भूमिकेत झळकल्या आहेत. या सहा अभिनेत्री चित्रपटामध्ये सख्ख्या बहिणी दाखवल्या गेल्या आहेत. केदार शिंदे यांचा हा चित्रपट पाहून महिलांनी अनेक दिवसातून कौटुंबिक चित्रपट पाहण्यासाठी मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त करत आहेत.