Film News : मुंबई : चित्रपट निर्माते संजय लीला भन्साळी यांचा सुपरहिट चित्रपट ‘पद्मावत’मध्ये अलाउद्दीन खिलजीच्या भूमिकेत आधी रणवीर सिंहऐवजी शाहरुख खान झळकणार होता. मात्र, शाहरुख खानने एका अटीमुळे या चित्रपटातून काढता पाय घेतला होता.
त्यालाही ही भूमिका आवडली होती;
(Film News)मीडिया रिपोर्ट्सनुसार, जेव्हा संजय लीला भन्साळी यांनी रणवीर सिंहला हे पात्र ऑफर केले. तेव्हा त्याने होकार देण्यासाठी बराच वेळ घेतला होता. त्यामुळे संजय लीला भन्साळी त्यांच्या चित्रपटाची क्रिप्ट घेऊन थेट शाहरुख खानकडे गेले होते. त्यावेळी शाहरुख खानने ‘पद्मावत’ची कथा वाचली आणि त्यालाही ही भूमिका आवडली होती. पण, शाहरुख खानने संजय लीला भन्साळींना चित्रपटाचे नाव बदलण्यास सांगितले होते. सुरुवातीला या चित्रपटाचे नाव ‘पद्मावती’ असे होते. रिपोर्टनुसार, शाहरुखने तेव्हा संजय लीला भन्साळी यांना असे सांगितले होते की, नायिकेच्या नावावर असलेल्या चित्रपटात त्याला पाहून चाहते नाराज होतील. (Film News)
शाहरुख खानच्या या अटीमुळे संजय लीला भन्साळी चांगलेच अडचणीत आले होते. त्यानंतर ‘पद्मावत’मध्ये अलाउद्दीन खिलजीच्या भूमिकेत शाहरुख खानऐवजी रणवीर झळकला. हा सिनेमा चांगलाच हिट झाला.