नवी दिल्ली: बॉलिवूड अभिनेता प्रकाश राज (Prakash Ra) यांच्या अडचणी वाढू शकतात. प्रणव ज्वेलर्स मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीने त्यांना समन्स बजावले आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) त्रिची स्थित भागीदारी फर्म प्रणव ज्वेलर्स विरुद्ध मनी लाँड्रिंग चौकशीच्या संदर्भात अभिनेता प्रकाश राज यांना समन्स बजावले आहे.
त्रिचीस्थित प्रणव ज्वेलर्सने उच्च परतावा देण्याचे आश्वासन देऊन सोने गुंतवणूक योजनेच्या नावाखाली लोकांकडून १०० कोटी रुपये गोळा केल्याचा आरोप आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, प्रकाश राज (Prakash Raj) हे प्रणव ज्वेलर्सचे ब्रँड अॅम्बेसेडर होते आणि या प्रकरणात त्याची चौकशी सुरू आहे. कथित पॉन्झी स्कीम चालवल्याच्या आरोपावरून ईडीने सोमवारी कंपनीवर छापा टाकला होता.
ED summons actor Prakash Raj for questioning in ponzi scam-linked money laundering case against Trichy-based jewellery group: Officials
— Press Trust of India (@PTI_News) November 23, 2023
बुधवारी जारी केलेल्या निवेदनात, ईडीने म्हटले आहे की, “तपासात असे दिसून आले आहे की प्रणव ज्वेलर्स आणि इतर संबंधित व्यक्तींनी सराफा/सोन्याचे दागिने खरेदी करण्याच्या नावाखाली सार्वजनिक निधी बनावट संस्था/अॅक्सेस प्रदात्यांकडे हस्तांतरित करून जनतेची फसवणूक केली आहे.”