Friday, October 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘धुरंधर’चे ऐतिहासिक यश, पण ‘डॉन 3’ वादामुळे रणवीर सिंह अडचणीत; 40 कोटींच्या नुकसानभरपाईची मागणी

Santosh Mundeby Santosh Munde
Tuesday, 10 February 2026, 11:47

मुंबई: आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ या चित्रपटातील हमजा अली मजारीच्या भूमिकेसाठी अभिनेता रणवीर सिंहवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. मल्टीस्टारर ‘धुरंधर’ने बॉक्स ऑफिसवर ऐतिहासिक यश मिळवत 1,000 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला असून, या चित्रपटाने अनेक नवे विक्रम प्रस्थापित केले आहेत. मात्र, या अभूतपूर्व यशानंतरही रणवीर सिंहला मोठ्या आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागल्याचे समोर आले आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रणवीर सिंह आणि ‘डॉन 3’ या बहुचर्चित चित्रपटाचे निर्माते एक्सेल एंटरटेन्मेंट यांच्यातील वादामुळे अभिनेत्याला कोट्यवधींचा फटका बसण्याची शक्यता आहे. रणवीरने हा चित्रपट अचानक सोडल्याने प्रॉडक्शन कंपनीचे मोठे नुकसान झाल्याचा दावा करण्यात आला आहे.

‘व्हरायटी इंडिया’च्या अहवालानुसार, एक्सेल एंटरटेन्मेंटने रणवीर सिंहकडे थेट 40 कोटी रुपयांची नुकसानभरपाई मागितली आहे. रणवीरने चित्रपटातून माघार घेतल्यामुळे आर्थिक गुंतवणूक, शूटिंग शेड्युल, नियोजन आणि आधीच करण्यात आलेल्या कमिटमेंट्सवर परिणाम झाल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. याच पार्श्वभूमीवर प्रॉडक्शन हाऊसने काही विभाग बंद केले असून, काही विभागप्रमुखांना अन्य प्रकल्प शोधण्यास सांगण्यात आल्याची माहिती आहे.

दरम्यान, रणवीर सिंहने या आरोपांना नकार दिला आहे. एक्सेल एंटरटेन्मेंटला कोणतीही नुकसानभरपाई देण्याची आपली जबाबदारी नसल्याचे त्याने स्पष्ट केले आहे. याआधीही आपण कोणत्याही आर्थिक दाव्यांशिवाय प्रकल्पातून बाहेर पडलो असल्याचे सांगत, या वादाला अनावश्यक वळण देऊ नये, अशी भूमिका रणवीरने घेतली आहे.

 

सूत्रांच्या माहितीनुसार, रणवीरला ‘डॉन 3’ची पटकथा अपेक्षेप्रमाणे वाटली नव्हती. त्याने पटकथेत अनेक बदल सुचवले होते, मात्र अंतिम मसुद्यावर समाधान न झाल्यामुळेच त्याने प्रकल्प सोडण्याचा निर्णय घेतल्याचे म्हटले जाते. दुसरीकडे, एक्सेल एंटरटेन्मेंटने दावा केला आहे की रणवीरच्या माघारीपर्यंत चित्रपटाचे प्री-प्रॉडक्शन सुरू झाले होते.

या प्रकरणावर तोडगा काढण्यासाठी शुक्रवारी रणवीर सिंह आणि प्रॉडक्शन हाऊसच्या प्रतिनिधींमध्ये जवळपास दोन तास चर्चा झाली. मात्र, या बैठकीत कोणताही ठोस निर्णय होऊ शकला नाही.

दरम्यान, रणवीर सिंह लवकरच ‘धुरंधर’च्या दुसऱ्या भागातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘धुरंधर 2’ हा चित्रपट 19 मार्च  2026 रोजी प्रदर्शित होणार असून, पहिल्या भागासाठी रणवीरने सुमारे 30 ते 40 कोटी रुपयांचे मानधन घेतल्याचे समजते.

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

‘कॉकरोच जनता पार्टी’चा आंदोलनासाठी मास्टर प्लॅन! 200 स्वयंसेवक, मेडिकल कॅम्प अन् 50 हजार Gen Z मैदानात

Friday, 2 October 2026, 15:21

शेवटचे क्षण CCTVमध्ये कैद! चौथ्या मजल्यावरून उडी मारण्यापूर्वी प्रेमानंद महाराजांच्या शिष्यांसोबत नेमकं काय घडलं? पहा व्हिडीओ

Friday, 2 October 2026, 15:13

‘पूर्णेकरांची हत्या झाली तेव्हा कुठे होतात?’ मीनाक्षी शिंदेंचा थेट सवाल; ‘त्या प्रश्नाचं उत्तर तर…’ म्हणत कुणावर साधला निशाणा?

Friday, 2 October 2026, 14:59

PMCचा मोठा निर्णय! कलम 210च्या रस्त्यांवर बांधकामाला आता NOC बंधनकारक; नियम मोडल्यास अधिकाऱ्यांवरही कारवाई

Friday, 2 October 2026, 14:45

पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीवरून निवडणूक आयोग वादात ! मतदार यादीतील घोळामुळे प्रश्नचिन्ह..

Friday, 2 October 2026, 14:43

अभिनेता डिनो मोरियाला राहत्या घरातून अटक ;आदित्य ठाकरेंशी जवळचे संबंध, नेमकं प्रकरण काय?

Friday, 2 October 2026, 14:21
Next Post

खिडकी तोडली, उडी मारली अन् फरार! गंभीर गुन्ह्यातील आरोपीचं येरवडा कोठडीतून पलायन अन् नंतर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp