Sunday, August 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Big Breaking : अष्टविनायक भाविकांसाठी मोठी बातमी! थेऊर, मोरगाव आणि सिद्धटेकची मंदिरे महिनाभर दर्शनासाठी बंद

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 8 May 2026, 18:11

Big Breaking लोणी काळभोर, ता. ८ : संपूर्ण महाराष्ट्राचे श्रद्धास्थान असलेल्या अष्टविनायक यात्रेतील तीन प्रमुख गणपती मंदिरांबाबत मोठा आणि ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. श्री क्षेत्र मोरगाव येथील श्री मयुरेश्वर मंदिर, श्री क्षेत्र थेऊर येथील श्री चिंतामणी मंदिर आणि श्री क्षेत्र सिद्धटेक येथील श्री सिद्धिविनायक मंदिर ही मंदिरे १० मे २०२६ ते ९ जून २०२६ या कालावधीत भाविकांसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहेत. मंदिरांच्या जतन, संवर्धन आणि दुरुस्तीच्या व्यापक कामांसाठी हा निर्णय घेण्यात आला असून यामुळे राज्यभरातील लाखो गणेशभक्तांवर परिणाम होणार आहे. Big Breaking

अष्टविनायक विकास आराखड्याअंतर्गत महाराष्ट्र शासनाने पुरातत्त्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली मंदिरांच्या संवर्धनासाठी मोठा निधी उपलब्ध करून दिला आहे. या निधीतून मंदिरांच्या मूळ पौराणिक स्वरूपाचे जतन करण्यासाठी दगडी बांधकाम, गाभाऱ्याचे संवर्धन, सभामंडप दुरुस्ती आणि परिसर सुशोभीकरणाची कामे सुरू करण्यात आली आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून या तिन्ही मंदिरांमध्ये युद्धपातळीवर काम सुरू असून आता मुख्य गाभारा आणि सभामंडपाच्या संवर्धनाच्या अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यात प्रवेश झाला आहे. Big Breaking

भाविकांची गर्दी ठरतेय अडथळा
पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, मंदिर परिसरात दररोज हजारो भाविकांचा वावर असतो. त्यामुळे संवर्धनाची कामे सुरक्षितपणे आणि वेळेत पूर्ण करणे कठीण होत आहे. मुख्य गाभाऱ्यातील कामे अत्यंत नाजूक स्वरूपाची असल्याने गर्दीमुळे अपघात किंवा कामांमध्ये विलंब होण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यामुळे मंदिर काही काळासाठी पूर्णपणे बंद ठेवण्याचा प्रस्ताव सह धर्मादाय आयुक्त, पुणे विभाग यांच्याकडे सादर करण्यात आला होता. Big Breaking

चिंचवड देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त मंदार महाराज देव यांनी भाविकांना सहकार्याचे आवाहन करताना सांगितले की, “मंदिरांचे जतन आणि संवर्धन ही काळाची गरज आहे. पुढील अनेक पिढ्यांसाठी अष्टविनायक मंदिरांचे मूळ वैभव टिकवून ठेवण्यासाठी ही कामे अत्यंत महत्त्वाची आहेत. भाविकांनी प्रशासन आणि मंदिर संस्थानाला सहकार्य करावे.”

 

भाविकांसाठी महत्त्वाच्या सूचना
मंदिरांमध्ये श्रींची नित्य पूजा, आरती व धार्मिक विधी नियमित सुरू राहतील. मात्र या कालावधीत भाविकांना प्रत्यक्ष दर्शन घेता येणार नाही. मंदिर परिसरात प्रवेश फक्त पुजारी, अधिकृत अधिकारी, कर्मचारी, बांधकाम यंत्रणा आणि विश्वस्तांनाच दिला जाणार आहे.दरम्यान, अष्टविनायक यात्रेतील तीन प्रमुख मंदिरांचे दरवाजे तब्बल महिनाभर बंद राहणार असल्याने राज्यभरात या निर्णयाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. Big Breaking

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

समृद्धी महामार्गावर गॅस पाईपलाईनला मोठी गळती! दुर्गंधीने परिसरात खळबळ; वाहनांच्या लांबच लांब रांगा

Saturday, 29 August 2026, 23:14

मोठी बातमी! मुंबई उच्च न्यायालयाची लिपिक भरती परीक्षा रद्द; नव्या तारखेची लवकरच घोषणा

Saturday, 29 August 2026, 22:54

पुण्यात आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा मोठा विजय! 17 दिवसांच्या उपोषणानंतर सरकार झुकलं; धडाधड GR जारी

Saturday, 29 August 2026, 22:39

धबधब्यावरचा आनंद ठरला अखेरचा!पाय घसरला अन् तरुणी वाहून गेली; दुर्दैवी मृत्यू

Saturday, 29 August 2026, 21:39

पोल्ट्री आणि पशुपालकांच्या न्याय्य हक्कासाठी 1 सप्टेंबरला पुण्यात मूक मोर्चा: GR असूनही अंमलबजावणी का नाही?

Saturday, 29 August 2026, 21:24

खाजगी क्लासला फाटा; स्व-अभ्यासाच्या जोरावर ऋषिकेश बेंद्रे राज्यात प्रथम!

Saturday, 29 August 2026, 20:16
Next Post

SSC Result : कुंजीरवाडीची प्रतिक्षा लटके दहावीच्या परीक्षेत ९१.८० टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp