Thursday, July 23, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Police Suspended : “कोम्बिंग ऑपरेशन”च्या नावाखाली पबमध्ये रंगेलपणा; पत्नीच्या तक्रारीनंतर पोलीस हवालदार निलंबित

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 8 May 2026, 16:51

Pune Police Suspended लोणी काळभोर, ता. ८ : “कोम्बिंग ऑपरेशनची ड्युटी आहे”, “तपासासाठी बाहेर आहे”, “ससूनमध्ये मयत लागले आहे” अशा सबबी सांगत पत्नीला फसवणाऱ्या पोलीस हवालदाराचा अखेर पर्दाफाश झाला आहे. पिंपरी-चिंचवडमधील पबमध्ये एका महिलेसोबत मौजमजा करताना पत्नीने रंगेहाथ पकडल्यानंतर संबंधित पोलीस हवालदाराविरोधात कौटुंबिक छळाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला निलंबित करण्यात आले आहे. Pune Police Suspended

हनुमंत गुलाब कांबळे (रा. पीर वस्ती, वडकी) असे निलंबित करण्यात आलेल्या पोलीस हवालदाराचे नाव आहे. तो काळेपडळ पोलीस ठाण्यात कार्यरत होता. या प्रकरणी त्याच्या पत्नीने काळेपडळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. Pune Police Suspended

मिळालेल्या माहितीनुसार, हनुमंत कांबळे यांचा विवाह २ जानेवारी २००३ रोजी झाला असून त्यांना दोन मुले आहेत. सुरुवातीला कुटुंबाची जबाबदारी व्यवस्थित सांभाळणारा कांबळे गेल्या दीड वर्षांपासून घरी उशिरा येऊ लागला होता. कामावरून उशीर का होतो, असे पत्नीने विचारल्यास तो “तपास आहे”, “मयत लागले आहे”, “मी ससूनमध्ये आहे” अशी कारणे सांगत होता. तसेच तो वारंवार बेडरूमला कडी लावून मोबाईलवर बोलत असल्याने पत्नीला संशय आला. Pune Police Suspended

 

पत्नीने मोबाईल तपासला असता एका महिलेशी सतत चॅटिंग सुरू असल्याचे दिसून आले. त्याबाबत विचारणा केल्यावर “ती महिला पोलीस ठाण्यात तक्रारीसाठी आली होती, तेव्हापासून ओळख झाली,” असे सांगून त्याने पत्नीची समजूत काढली. मात्र, १५ जून २०२६ रोजी त्याने “कोम्बिंग ऑपरेशन ड्युटी” असल्याचे सांगून घराबाहेर पडत प्रत्यक्षात पिंपरी-चिंचवड येथील ‘सी डॉक’ पबमध्ये संबंधित महिलेसोबत दारू पार्टी केल्याचा आरोप आहे.

पत्नीने पबमध्ये जाऊन जाब विचारला असता, “मी पोलीस आहे, माझे काहीही होणार नाही. तू काही करू शकत नाहीस,” अशी उद्धट भाषा वापरल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्यानंतर “मी सुधारेल” अशी माफी मागून त्याने पत्नीची समजूत घातली होती. मात्र काही दिवसांनी रामटेकडी परिसरात त्याची कार संशयास्पद अवस्थेत दिसल्यानंतर पत्नीने पाठलाग केला असता तो संबंधित महिलेसोबत असल्याचे उघड झाले.

तक्रारीनुसार, कांबळे याने उंड्री परिसरात त्या महिलेसाठी स्वतंत्र फ्लॅट घेतला होता. पत्नीने एकदा त्या दोघांना एकत्रित आक्षेपार्ह अवस्थेत पाहिल्याचाही आरोप करण्यात आला आहे. एवढेच नव्हे तर पत्नीचे गहाण ठेवलेले सोने सोडवून त्याने संबंधित महिलेला दुचाकी घेऊन दिल्याचाही आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

५ मे २०२६ रोजी रात्रपाळीनंतर कांबळे घरी न परतल्याने पत्नी संबंधित महिलेच्या घरी गेली असता दार उघडण्यात आले नाही. घरमालकाने “एक पोलीस गॅलरीतून उडी मारून पळून गेला,” असे सांगितल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याबाबत जाब विचारल्यावर “मी तुला मारीन, मला तुझ्यासोबत राहायचे नाही, तुला घटस्फोट देईन,” अशी धमकी दिल्याचा आरोप पत्नीने केला आहे.या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हनुमंत कांबळे याला निलंबित केले असून पुढील तपास सुरू आहे.

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

मुसळधार पावसात एकटी तरुणी पोलिसांच्या व्हॅनसमोर उभी ठाकली; पाहा थरारक व्हायरल Video

Thursday, 23 July 2026, 22:58

“जनता मालक अन् शिक्षणमंत्री सेवक… राजीनामा द्यायलाच हवा!” अण्णा हजारेंच्या भूमिकेने वाढवली सरकारची धडधड

Thursday, 23 July 2026, 22:06

पुण्यात मुसळधार पावसामुळे मोठे रस्ते खचले! राजगड तालुक्यातील वाहतूक तडकाफडकी बंद; जिल्हाधिकाऱ्यांचे कडक आदेश

Thursday, 23 July 2026, 21:11

विद्यार्थ्यांवरील लाठीचार्ज महागात पडणार! एक जिल्हा, एक दिवस, एक मागणी; CJP ची उद्या संपूर्ण देशात ‘देशव्यापी आंदोलना’ची हाक

Thursday, 23 July 2026, 20:28

हवामान खात्याची मोठी चेतावणी! पुण्यात पावसाचा हाहाकार माजणार? जाणून घ्या हवामान तज्ज्ञांचा मोठा गौप्यस्फोट

Thursday, 23 July 2026, 19:27

सणसवाडीतील कंपनीतून ८०० लिटर डिझेल चोरीचा पर्दाफाश; दोन सराईत चोरटे जेरबंद

Thursday, 23 July 2026, 19:21
Next Post

ST Bus News : कुंजीरवाडीकरांचा एसटी थांब्यासाठी एल्गार; प्रवाशांच्या सोयीसाठी प्रशासनाकडे जोरदार मागणी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.