Wednesday, July 22, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

ST Bus News : कुंजीरवाडीकरांचा एसटी थांब्यासाठी एल्गार; प्रवाशांच्या सोयीसाठी प्रशासनाकडे जोरदार मागणी

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 8 May 2026, 17:00

ST Bus News  लोणी काळभोर, ता. ८ : कुंजीरवाडी (ता. हवेली) येथे एसटी महामंडळाचा अधिकृत थांबा सुरू करण्यात यावा, या मागणीसाठी शिवसेना हवेली तालुका प्रमुख स्वप्नील कुंजीर यांनी एसटी महामंडळाच्या पुणे विभागीय मुख्य अधिकारी अरुण भगतसिंग सिया यांना निवेदन सादर केले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते गणेश कुंजीर उपस्थित होते. ST Bus News

कुंजीरवाडी हे गाव लोकसंख्या, व्यापार आणि रहिवाशांच्या दृष्टीने वेगाने विकसित होत असून, येथे मराठवाडा आणि विदर्भातील हजारो कुटुंबे वास्तव्यास आहेत. सोलापूर, धाराशिव, बीड, लातूर, नांदेड, परभणी आणि अहिल्यानगरसह विविध जिल्ह्यांतील नागरिक रोजगार, व्यवसाय आणि शिक्षणासाठी कुंजीरवाडीत स्थायिक झाले आहेत. मात्र गावात एसटीचा थांबा नसल्यामुळे नागरिकांना प्रवासासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. ST Bus News

विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि कामगार वर्गाला रोजच्या प्रवासात त्रास सहन करावा लागत असून, गाणगापूर, तुळजापूर, पंढरपूर आणि अक्कलकोटसारख्या धार्मिक स्थळांना जाणाऱ्या भाविकांचीही मोठी गैरसोय होत आहे. कुंजीरवाडीपासून जवळपास सात किलोमीटर अंतरावर दुसरा एसटी थांबा असल्याने नागरिकांना खासगी वाहनांवर अवलंबून राहावे लागत आहे.

 

सरकारी दवाखान्याजवळ एसटी थांबा सुरू झाल्यास परिसरातील हजारो नागरिकांना मोठा दिलासा मिळेल, असा विश्वास स्वप्नील कुंजीर पाटील यांनी व्यक्त केला. गावाची वाढती लोकसंख्या, व्यापारी महत्त्व आणि नागरिकांची गरज लक्षात घेऊन प्रशासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. दरम्यान, विभागीय अधिकारी अरुण भगतसिंग सिया यांच्यासोबत झालेल्या चर्चेत लवकरच याबाबत सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन देण्यात आल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुण्यातील नामांकित हॉटेल्स अन् रेस्टॉरंट्सवर FDAची कारवाई; १२ जणांचे परवाने तडकाफडकी निलंबित

Wednesday, 22 July 2026, 22:00

पळसनाथ विद्यालयात रंगला विद्यार्थ्यांचा दिंडी सोहळा! भक्तिमय वातावरणात विठूनामाचा जयघोष…

Wednesday, 22 July 2026, 21:53

प्रेमासाठी नव्हे तर पैश्यांसाठी ठेवले संबंध! शिक्षिकेचे अनेक वर्षांपासून मित्रासोबत संबंध; मित्राची नियत फिरली अन् घडलं भयंकर

Wednesday, 22 July 2026, 21:15

वंचित बहुजन आघाडीची उद्या ‘महाराष्ट्र बंद’ची हाक! पुण्यात सकाळी १० वाजता होणार आंदोलनाला सुरुवात

Wednesday, 22 July 2026, 20:23

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! आठव्या वेतन आयोगामुळे पगार किती वाढणार? समोर आली धक्कादायक आकडेवारी

Wednesday, 22 July 2026, 19:37

डाळिंब येथे आषाढी एकादशीनिमित्त श्री विठ्ठलाची महापूजा व विविध धार्मिक कार्यक्रमांचे भव्य आयोजन – अध्यक्ष राजेंद्र कांचन यांची माहिती..

Wednesday, 22 July 2026, 19:28
Next Post

Fake Marriage : बीडच्या ‘लुटारू नवरी’चा “नऊ लग्नांचा सापळा!” धमक्यांमुळेच लग्ने केली असल्याचा दावा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.