मुंबई : अभिनेता रणवीर सिंग आणि दिग्दर्शक रोहित शेट्टी यांचा चित्रपट म्हणजे निखळ मनोरंजन. मात्र यावेळी हे समीकरण जुळून आले नसल्याचे दिसून येत आहे. रणवीर सिंगला या चित्रपटकडून खूप अपेक्षा होत्या, मात्र काल आणि आज चित्रपटाला म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नसल्याने ‘सर्कस’ हा चित्रपट डब्यात जाण्याची शक्यता जास्त निर्माण झाली आहे.
या चित्रपटासाठी अभिनेता रणवीर सिंग आणि दिग्दर्शक रोहित शेट्टी यांनी जोरदार प्रमोशन देखील केले होते. तरीदेखील चित्रपटाला हावी तशी ओपनिंग मिळाली नाही.
रोहित शेट्टीचे जास्त चित्रपट हे काॅमेडीवर आधारित असतात. सर्कस चित्रपट देखील काॅमेडीवरच आहे. कपिल शर्मा शोपासून ते बिग बाॅसपर्यंत सर्वत्र प्रमोशन करण्यात आले. रोहित शेट्टीच्या दहा वर्षांमधील चित्रपटाच्या तुलनेत सर्कस चित्रपटाची ओपनिंग सर्वात कमी ठरलीये.
सर्कस या चित्रपटाची ओपनिंग धमाकेदार होण्याची अपेक्षा होती. मात्र, चित्रपटाची ओपनिंग साधारणच राहिली आहे. या चित्रपटाने शुक्रवारी केवळ ७.५ कोटी ते ८.३ पर्यंत कमाई केली असून हा आकडा रोहित शेट्टीच्या इतर चित्रपटाच्या तुलनेत फारच कमी आहे.
सर्कस हा चित्रपट ओपनिंग डेलाच १० कोटींच्या पुढे बाॅक्स ऑफिस कलेक्शन करेल. मात्र, असे होऊ शकले नाहीये. आता शनिवार आणि रविवारचा फायदा हा चित्रपटाला होण्याची शक्यता आहे.