पुणे : बॉलिवूड अभिनेत्री जया बच्चन यांच्या आईचे दीर्घ आजारामुळे निधन झाले. त्यांच्या आई इंदिरा भादुरी या वयाच्या 94 वर्षी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. परंतु त्यांची आजाराशी झुंज अपयशी ठरली. बच्चन कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
मंगळवारी (दि. 22 ऑक्टोबर) रात्री जया बच्चनच्या आई इंदिरा भादुरी यांची प्रकृती अधिकच बिघडली. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या निधनाची बातमी कळताच अभिषेक बच्चन तातडीने भोपाळच्या दिशेने रवाना झाले.
दरम्यान, इंदिरा भादुरी यांचे पती तरुण भादुडी पत्रकार होते. वेगवेगळ्या वर्तमानपत्रांमध्ये त्यांनी काम केल्याचं सांगितलं जातं आहे.