KBC Season 17: ‘कौन बनेगा करोडपती ‘चा नवीन सीझन लवकरच येणार आहे. दरम्यान, आनंदाची बातमी अशी कि, अमिताभ बच्चन आगामी सीझन देखील होस्ट करणार आहेत. अमिताभ बच्चन यांनी दुजोरा दिला असून याबद्दल माहिती दिली आहे. अमिताभ बच्चन कौन बनेगा करोडपती हा शो सोडणार असल्याचे सांगण्यात येत होते. परंतु कौन बनेगा करोडपतीचा 17 वा सीझन अमिताभ बच्चन होस्ट करणार असल्याने चाहते खूश झाले आहे. 12 मार्च रोजी, निर्मात्यांनी अमिताभ यांचा एक भावनिक व्हिडिओ जारी केला होता, ज्यामध्ये त्यांनी चाहत्यांना सांगितले होते की, पुढच्या सीझनला भेटू.
बिग बी यांनी शोच्या प्रभावाबद्दल एक हृदयस्पर्शी भावना शेअर केली कि, “मला एवढेच सांगायचे आहे की, जर आमच्या प्रयत्नांनी कोणाच्याही जीवनाला थोडासा स्पर्श केला असेल, किंवा येथे बोललेल्या शब्दांनी काही आशा निर्माण केल्या असतील, तर मला समजेल की आमचे 25 वर्षांचे प्रयत्न यशस्वी झाले आहेत, आता मी तुम्हाला पुढच्या फेरीत भेटेन. तुमच्या मेहनतीवर विश्वास ठेवा, तुमची स्वप्ने जिवंत ठेवा. थांबू नका, तोपर्यंत या मंचावरून मी अमिताभ बच्चन आहे, असे म्हणत या फेरीसाठी शेवटच्या वेळी ‘शुभरात्री’ असे ते म्हणाले.