पुणे : बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन आज 11 ऑक्टोबर रोजी आपला 81 वा वाढदिवस साजरा करत आहेत. बॉलिवूडमधील बिग बी आजही ‘अँग्री यंग मॅन’ या नावानेही ओळखले जात आहेत. शहेनशाह, महानायक अशा अनेक नावांनी त्यांची ओळख या सिनेमासृष्टीत गाजत आहे. अभिनेत्याने साकारलेल्या भूमिका आजही प्रेक्षकांना खूप जवळच्या वाटतात.
अमिताभ बच्चन हे वयाच्या 82 व्या वर्षीही चित्रपटांमध्ये अफलातून भूमिका साकारत आहेत. त्यांना आता चित्रपटसृष्टीत 55 वर्षे झाली असून या काळात त्यांनी 130 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. अमिताभ बच्चन यांच्या करिअरच्या सुरुवातीलाच 12 सिनेमे फ्लॉप झाले. पण त्यांनी धीर सोडला नाही. त्यांनी आपले प्रयत्न सुरूच ठेवले. 12 चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर त्यांच्या आयुष्यात ‘जंजीर’ हा सिनेमा आला. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपर डुपर हिट झाला आणि मग त्यांच्या करिअरची गाडी खऱ्या अर्थाने रुळावर आली.
म्हणून बिग बी दोन वाढदिवस साजरे करतात…
11 ऑक्टोबर ऐवजी अमिताभ बच्चन 2 ऑगस्ट रोजी दुसरा वाढदिवस साजरा करतात. कुली चित्रपटाच्या शुटींगदरम्यान, अमिताभ बच्चन गंभीर जखमी झाले होते. बंगळुरुमध्ये सेटवर त्यांना गंभीर दुखापत झाली होती. यावेळी हजारो फॅन्स रुग्णालयाबाहेर त्यांच्यासाठी प्रार्थना करत होते. त्यानंतर 2 ऑगस्ट 1982 रोजी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. त्यावेळी ते ठणठणीत बरे झाले. याच कारणामुळे अमिताभ बच्चन 2 ऑगस्ट रोजी दुसरा वाढदिवस साजरा करतात.