मुंबई: अजय देवगणचा ‘रेड २’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहेत. चित्रपटाने पहिल्या सहा दिवसांत ८५ कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे आणि लवकरच तो १०० कोटी रुपयांचा टप्पा गाठेल अशी अपेक्षा आहे. रेड २ च्या आकर्षक कथानकामुळे आणि दमदार अभिनयामुळे ‘रेड २’ ला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन चांगले राहिले आहे. रेड २ या चित्रपटाने गुरुवारी १९.२५ कोटी, शुक्रवारी १२ कोटी, शनिवारी १८ कोटी, रविवारी २२ कोटी, सोमवारी ७.५ कोटी आणि मंगळवारी ६.७५ कोटी रुपये. एकूण कलेक्शन ८५.५० कोटी रुपये आहे.
‘रेड २’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणाऱ्या राजकुमार रावच्या ‘भूल चुक माफ’ चित्रपटाशी स्पर्धा करण्याची शक्यता आहे. तथापि, ‘रेड २’ सध्या मजबूत स्थितीत आहे आणि १०० कोटींचा टप्पा ओलांडण्याची शक्यता आहे. बॉक्स ऑफिसवर त्याच्या दमदार कामगिरीमुळे, ‘रेड २’ अजय देवगणसाठी एक मोठा हिट ठरण्याची शक्यता आहे.