Uruli Kanchan News : (पुणे) : उरुळी कांचन येथील महात्मा गांधी विद्यालयातील इयत्ता आठवीचे ७ विद्यार्थी जिल्हा शिष्यवृत्तीसाठी पात्र झाले असल्याची माहिती विद्यालयाचे प्राचार्य भारत भोसले यांनी दिली आहे.(Uruli Kanchan News)
७ विद्यार्थी जिल्हा शिष्यवृत्तीसाठी पात्र.
शौक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत ७ विद्यार्थी हे गुणवत्ता यादीत आले असून विद्यालयाचा निकाल हा ४२ टक्के लागला आहे.(Uruli Kanchan News)
शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी खालीलप्रमाणे मिळालेले गुण कंसात : शांभवी बाळासाहेब खेडेकर (२१८), धर्मराजा दत्तात्रय बाते (१९८), प्रज्ञा रामचंद्र कांबळे (१९०), शिवम निलेश गोलांडे (१९०), फरीन जावेद मुलानी (१८२), कुलदीप रामचंद्र ओव्हाळ (१७४), कार्तिकी अविनाश कांबळे (१६२)(Uruli Kanchan News)
दरम्यान, या यशाबद्दल सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणारे अध्यापक शेखर शिंदे, वैशाली ढोबळे, शीतल वाळके, रुपाली खानदेशे, ज्योत्सना काळे, सविता कडलग या सर्वांचे संस्थेच्या सर्व पदाधिकारी, पालक विश्वस्त राजाराम कांचन, सर्व विश्वस्त, प्राचार्य भारत भोसले, उपप्रमुख जाधव सर, सर्व पर्यवेक्षक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विशेष कौतुक व अभिनंदन केले.