पुणे : येत्या शैक्षणिक वर्षात २०२५-२६ मध्ये राज्यातील विदर्भ वगळता सर्व शाळा १६ जूनला सुरू होणार आहेत. विदर्भातील शाळा २३ ते २८ जून या कालावधीत सुरू होतील. उद्या १ मे रोजी निकाल व २ मे पासून शाळांना सुट्टी जाहीर झाली आहे.
शिक्षण विभागाने शाळांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. संकलित मूल्यमापन चाचणीमुळे यंदा शाळा २५ एप्रिल पर्यंत सुरु होत्या. १ मे रोजी निकाल व २ मे पासून सुट्टी जाहीर झाली आहे. अपवादत्मक परिस्थितीत शाळा ३० जूनपासून सुरु करण्यास मुभा देण्यात आली आहे. तीव्र उन्हाळाच्या परिस्थितीत विदर्भातील शाळा २३ ते २८ जून या कालावधीत सुरु होतील, असे शिक्षण विभागाकडून कळविण्यात आले आहे.